नूलच्या हॉकीपटूंना अर्थसाहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:22 AM2021-05-01T04:22:30+5:302021-05-01T04:22:30+5:30

येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेतील २७ हॉकीपटूंना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग व पंचायत समिती यांच्या ...

Financing Null's hockey players | नूलच्या हॉकीपटूंना अर्थसाहाय्य

नूलच्या हॉकीपटूंना अर्थसाहाय्य

googlenewsNext

येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेतील २७ हॉकीपटूंना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘तारांगणा गौरव’ प्रमाणपत्र व प्रत्येकी ५ हजार रुपये रोख असे एकूण १ लाख ३५ हजारांचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले. विशेष म्हणजे या सर्व खेळाडू मुली आहेत. गौरवपात्र हॉकी खेळाडू असे अस्मिता चव्हाण, प्रतिज्ञा कोळी, हर्षदा पवार, भक्ती गड्डी, तेजश्री खणदाळे, सावित्री बोरगल्ली, श्रेया कुराडे, सौम्या कडलगे, रेवती चव्हाण, वासंती वडगोळ, सारिका आरबोळे, लीना घेवडे, मनीषा देसाई, वैष्णवी थोरात, स्वप्नाली माने, सानिका माने, लता भदरगे, अनुदी चव्हाण, नेत्रा चव्हाण, महानंदा मास्तोळी, समीक्षा शेगुणशी, माधुरी भोसले, कृष्णा माने, साक्षी सूर्यवंशी, पूजा मोरे, स्वाती फुटाणे, अमृता जाधव या खेळाडूंना क्रीडाशिक्षक रमेश चौगुले, मनोहर मांगले यांचे मार्गदर्शन, तर प्राचार्य जयवंत वडर, पर्यवेक्षक गणपती चोथे यांचे मार्गदर्शन लाभले.

याकामी पं. स. सभापती रूपाली कांबळे, उपसभापती ईराप्पा हसुरी, आनंद गजगेश्वर, महादेव माने, पर्यवेक्षिका एस. जे. आवळे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Financing Null's hockey players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.