मारेकºयांचा शोध लावा, यामागील खरे सूत्रधार पकडावे, -‘निर्भय वॉक’ रंकाळा परिसरात-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 04:39 PM2018-11-20T16:39:31+5:302018-11-20T16:44:04+5:30
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे अमर रहे.., खुन्यांना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा धिक्कार असो.., खुनी सनातनी...चले जाव’ अशा घोषणांनी मंगळवारी सकाळी रंकाळा परिसर दणाणून गेला.
कोल्हापूर : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे अमर रहे.., खुन्यांना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा धिक्कार असो.., खुनी सनातनी...चले जाव’ अशा घोषणांनी मंगळवारी सकाळी रंकाळा परिसर दणाणून गेला. निमित्त होते शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्यावतीने रंकाळा परिसरात काढण्यात आलेल्या निर्भय मॉर्निंग वॉकचे.ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकºयांचा शोध लावा, यामागील खरे सूत्रधार पकडावे, या मागणीसाठी या ‘मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले होते.
संध्यामठ घाट येथून मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. रंकाळा टॉवर, रंकाळा उद्यान यामार्गे पुन्हा संध्यामठ घाट येथे मॉर्निंग वॉकची सांगता झाली. यावेळी प्रकाश हिरेमठ यांनी ‘मारली तू गोळी...’ हे गीत सादर केले. यावेळी बी. एल. बरगे, संभाजीराव जगदाळे, वसंतराव पाटील, अनिल चव्हाण, दिलीप पवार, मेघा पानसरे, सुनंदा चव्हाण, बिजली कांबळे, वंदना पाटील, विजया पाटील, बाबूराव लाटकर, माणिक यादव, हसन देसाई, प्रा. सुभाष जाधव, विनोदसिंह पाटील, सुभाष सावंत, बंडू माने, अॅड. अजित चव्हाण, सतीश पाटील, सतीशचंद्र कांबळे, अशोक भोईटे, अजय अकोळकर, अजित कुलकर्णी, आनंदराव चौगले, अरुण पाटील, रमेश वडणगेकर, विकास जाधव, आदी उपस्थित होते. गंजी गल्ली बिंदू चौक येथून गंजी गल्ली परिसरात २० डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता संघर्ष समितीच्यावतीने निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.