शोधू कुठे रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:35+5:302021-08-02T04:09:35+5:30

शहराच्या प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना नीट वाहने चालविता येत नाहीत. त्यात अपघात होण्याचे ...

Find out where the road | शोधू कुठे रस्ता

शोधू कुठे रस्ता

Next

शहराच्या प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना नीट वाहने चालविता येत नाहीत. त्यात अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय वाहन दुरुस्तीसाठी होणारा खर्च परवडेनासाही झाला आहे. अनेकांना कंबरदुखी व मणक्याचे आजार जडले आहेत. पावसात वाहून गेलेल्या या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे ज्या ठेकेदाराने काम केले आहे. अशा ठेकेदार व त्याची तपासणी केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. शहरातील अनेक रस्ते, चौकांमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचून ते आणखी मोठे होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे या खड्ड्यांमध्ये वाहन गेल्यानंतर त्याची खोली वाहनधारकाला कळते. त्यामुळे अनेकदा वाहनधारकांचा तोल जाऊन पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील या रस्त्यांचे डांबरीकरण उन्हाळ्यापूर्वी केलेले आहे. त्यावरील डांबर कधीच निघून गेले आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते करणाऱ्या ठेकेदारांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

शहरातील खराब झालेले रस्ते असे

-शिवाजी चौक ते पापाची तिकटीकडे जाणारा रस्ता

- गंगावेश चौक ते दत्त महाराज मंदिर

- रेगे तिकटी ते भाजी मंडई

-पापाची तिकटी ते महापालिका माळकर तिकटी चौक

- बाबूजमाल रोड ते जोतिबा रोड

- धोत्री गल्ली ते केएमसी काॅलेज

- भवानी मंडप कमान ते जेल रोड

- स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर ते वायल्डर मेमोरियल चर्च रस्ता

- सीपीआर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, राजहंस प्रिटिंग प्रेससमोरील भाऊसिंगजी रोड, खरी काॅर्नर चौक

- शिवाजी पेठ, जुन्या बलभीम बँकेसमाेरील रस्ता

- गंगावेश दूध कट्टा परिसर

- राजारामपुरी शिवाजी विद्यापीठ रोड, कोळेकर तिकटी ते जुनी शाहू बँक रस्ता.

फोटो : ०१०८२०२१-कोल-ट्रेड सेंटर

ओळी : कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील ट्रेंड सेंटर ते वायल्डर मेमोरियल चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यावरी खड्डा.

फोटो : ०१०८२०२१-कोल-कलेक्टर ऑफिस

ओळी : नागाळा पार्कातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगतच्या रस्त्यावर खड्ड्यामुळे बारमाही पाणी साचून राहते.

फोटो : ०१०८२०२१-कोल- राजहंस प्रिटिंग

ओळी : नागाळा पार्कातील राजहंस प्रिटिंग प्रेस परिसरातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. यातून मार्ग काढताना वाहनधारकांना नाकीनऊ येत आहे.

फोटो : ०१०८२०२१-कोल- सीपीआर चौक

ओळी : कोल्हापुरातील बारमाही वर्दळीचा रस्ता म्हणून सीपीआर चौकाकडे पाहिले जाते. या चौकातील कसबा बावड्याकडे जातानाचा एक मोठा खड्डा.

फोटो : ०१०८२०२१-कोल-माळकर तिकटी

ओळी : महापालिका परिसरातील माळकर तिकटी मुख्य चौकात एका बाजूला खड्डा असल्यामुळे वाहनधारकांना अक्षरश: कसरत करत वाहन चालवावे लागते.

फोटो : ०१०८२०२१-कोल-खासबाग

ओळी : खासबागकडून मिरजकर तिकटीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही चाळण झाली आहे. या मार्गावरून वाहन चालविताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.

फोटो : ०१०८२०२१-कोल-कोळेकर तिकटी

ओळी : कळंबा, पाचगाव आदी उपनगरांकडे जाणाऱ्या कोळेकर तिकटी परिसरात नळ पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी काढलेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

फोटो : ०१०८२०२१-कोल-गुलाब गल्ली

ओळी : मंगळवार पेठेतील गुलाब गल्लीसमोरील रस्त्याचीही चाळण झाली आहे. फोटो : ०१०८२०२१-कोल-ट्रेड सेंटर

ओळी :फोटो : ०१०८२०२१-कोल-

खरी काॅर्नर ओळी : खरी काॅर्नर चौकातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

फोटो : ०१०८२०२१-कोल- बलभीम बँक, ०२

आेळी : शिवाजी पेठेतील जुन्या बलभीम बँकेसमोरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यातूनच वाहनधारक जीव मुठीत घेऊन वाहन चालवितात.

फोटो : ०१०८२०२१-कोल-गंगावेश

ओळी : शहरातील वर्दळीचा रस्ता म्हणून गंगावेश चौकाकडे पाहिले जाते. या चौकात गेल्या कित्येक महिन्यांपासून खड्डे आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी साठून राहत आहे.

फोटो : ०१०८२०२१-कोल- जेल रोड

ओळी : सातत्याने वर्दळीचा रस्ता म्हणून पाहीला जाणारा जेल रोडची दयनीय अवस्था झाली आहे. यातूनच वाहनधारक मार्गक्रमण करीत आहेत.

(सर्व छाया : नसीर अत्तार)

Web Title: Find out where the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.