दिवसभरात साडेतीन लाख रुपये दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:55+5:302021-04-20T04:26:55+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभरात विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर सुमारे साडेतीन लाख रुपये दंड करण्यात आला, तो वसूलही केला. ...
कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभरात विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर सुमारे साडेतीन लाख रुपये दंड करण्यात आला, तो वसूलही केला. दरम्यान, एकूण १९५७ वाहनधारकांवर कारवाई करून त्यापैकी १८६ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे गेले पाच दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी पुकारली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यासाठी दंडात्मक कारवाईचा फटका बसत आहे. तरीही नागरिकांनी कोरोना संसर्गाचे गांभीर्य घेतले नसल्याचे रस्त्यावरील गर्दीवरून दिसून येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या २६७ जणांना पथकाकडून सुमारे ७० हजार ३०० रुपयांचा दंड करण्यात आला, तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या सुमारे १९५७ वाहनचालकांवर कारवाई झाली. त्यापैकी १८६ वाहनांवर जप्तीची नामुश्की आली आहे. तसेच १७७१ वाहनांवर गुन्हे नोंदवून २ लाख ७७ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोल्हापूर शहरातही सोमवारी दिवसभर प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर जप्तीची व दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
फोटो नं. १९०४२०२१-कोल-पोलीस फोर्ड कॉर्नर चौक
ओळ : संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांना सोमवारी पोलिसांनी लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर चौकात अडवून त्यांच्यावर कारवाई केली. (छाया : नसीर अत्तार)
===Photopath===
190421\19kol_4_19042021_5.jpg
===Caption===
ओळ : संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिरणार्या वाहनधारकांना सोमवारी पोलिसांनी लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर चौकात आडवून त्यांच्यावर कारवाई केली (छाया: नसीर अत्तार)