वाहनधारकांकडून चार लाख रुपये दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:27+5:302021-06-09T04:31:27+5:30
कोल्हापूर : कोरोना कालावधीत प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे उल्लघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात मंगळवार १९५० वाहनांवर कारवाई केली. त्यामध्ये ७५ वाहने ...
कोल्हापूर : कोरोना कालावधीत प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे उल्लघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात मंगळवार १९५० वाहनांवर कारवाई केली. त्यामध्ये ७५ वाहने जप्त केली तर उर्वरित वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपये दंड वसूल केला. ही कारवाई कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने सुरू आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. त्याचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी पोलीस दलाच्यावतीने तीव्र मोहीम राबवली. निर्बंधांचे उल्लंघन करणा-या १८७५ वाहनांवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून ३ लाख ९४ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. तर विनामास्क फिरणा-या ३१४ जणांकडून ६६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. शिवाय विनापरवाना अस्थापना सुरू ठेवल्याबद्दल ६२ अस्थापनाधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ६० हजार ५०० रुपये दंड वसूल केला.