नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:57+5:302021-07-17T04:20:57+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाने शुक्रवारी दिवसभरात ...

A fine of Rs 5 lakh for violating the rules | नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच लाखांचा दंड

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच लाखांचा दंड

Next

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाने शुक्रवारी दिवसभरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनधारकांवर सुमारे पाच लाखांचा दंड आकारला.

जिल्हा पोलीस दलाने दिवसभरात वाहतूक नियमांचे पालन न करणे, मोटरवाहन कायद्यानुसार नोंदणी, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र मुदतीत नसणे, मास्क न लावणे, आस्थापना निर्धारित वेळेपेक्षा जादा काळ उघडी ठेवणे आदी नियमांचे भंग केल्याप्रकरणी दंड आकारण्यात आला.

कारवाई अशी,

मास्क न वापरणे - १३२२ - १ लाख ८८ हजार ५००

वाहन केसेस - १४५२ - २ लाख ७६ हजार ६००

आस्थापना कारवाई - ३४ - ३० हजार ६००

गुन्हे दाखल - ९

वाहने जप्त - २३५

Web Title: A fine of Rs 5 lakh for violating the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.