निर्बंध उल्लंघन करणाऱ्यांकडून साडेपाच लाख रुपये दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:56+5:302021-06-04T04:19:56+5:30
कोल्हापूर : कोरोना महामारीचे संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून गुरुवारी दिवसभरात सुमारे ५ लाख ३५ हजार ...
कोल्हापूर : कोरोना महामारीचे संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून गुरुवारी दिवसभरात सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई कोल्हापूर पोलीस दलाने संपूर्ण जिल्ह्यात केली. यामध्ये विनामास्कप्रकरणी १ लाख १५ हजार रुपये तर, विनापरवाना अस्थापना सुरू ठेवल्याबद्दल सव्वा लाख रुपये दंडाचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना संकटात संसर्गाची साखळी तुटावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रशासनाने नागरिकांना निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस दलातर्फे कारवाई सुरू आहे. गुरुवारी दिवसभरात विनामास्कप्रकरणी ४२६ जणांकडून १ लाख १५ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याशिवाय १३०७ वाहनांवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून २ लाख ९० हजार१०० रुपये दंड वसूल केला. तर ८७ वाहने जप्त केली. निर्धारवेळेपेक्षा जादा वेळ अस्थापना सुरू ठेवल्याबद्दल १०० जणांकडून १ लाख २५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. तसेच मॉर्निग वॉकप्रकरणी १० जणांकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला.