विनाकारण फिरणाऱ्यांवर साडेपाच लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:31 AM2021-07-07T04:31:33+5:302021-07-07T04:31:33+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पोलिसांनी मंगळवारी दिवसभर विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्याद्वारे पोलिसांनी ...

A fine of Rs | विनाकारण फिरणाऱ्यांवर साडेपाच लाखांचा दंड

विनाकारण फिरणाऱ्यांवर साडेपाच लाखांचा दंड

Next

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पोलिसांनी मंगळवारी दिवसभर विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्याद्वारे पोलिसांनी दिवसभरात ५ लाख ५१ हजारांचा दंड वाहनधारकांना केला. तर २०७ वाहने जप्त केली असून ८ गुन्हे दाखल केले.

दिवसभरात विविध ठिकाणी नाकाबंदीद्वारे पोलिसांनी मास्क न घातलेल्या १४८२ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना १ लाख ७९ हजार ६०० रुपयांचा दंड केला. मोटार वाहन केसेसद्वारे १३२६ जणांवरही कारवाई करण्यात आली. त्याद्वारे २ लाख ७२ हजारांचा दंड करण्यात आला. तर निर्धारित वेळेनंतरही आस्थापना सुरू ठेवल्याबद्दल ४१ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्यावरही ३३ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर वाहन चालविण्याचा परवाना न बाळगणे, वाहनाचा विमा न करणे, प्रदूषण प्रमाणपत्र नसणे, अशा कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या २०७ जणांची वाहने पोलिसांनी जप्त केली.

Web Title: A fine of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.