वडगावात शेती गोडाऊनला आग, लाखो रूपयांचे नुकसान: आगीचे कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:36 AM2021-04-20T11:36:43+5:302021-04-20T11:39:30+5:30
Fire Kolhapur : पेठवडगाव येथील पालिका चौकातील किसान शेती भांडार या दुकानाच्या गोडाऊनला आग लागून लाखो रूपयांची खते, रासायनिक औषधे खाक झाले. ही आग पहाटे पाचच्या सुमारास लागली होती. दोन तासांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली.वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
पेठवडगाव : येथील पालिका चौकातील किसान शेती भांडार या दुकानाच्या गोडाऊनला आग लागून लाखो रूपयांची खते, रासायनिक औषधे खाक झाले. ही आग पहाटे पाचच्या सुमारास लागली होती. दोन तासांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली.वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
येथील पालिकेच्या इमारतीमध्ये असणाऱ्या दुकान गाळे आहेत. यामध्ये आठ नंबरच्या दुकान कृष्णात घारसे यांचे किसान शेती भांडार असे बियाणे खते विक्रीचे दुकान आहे. या दुकाना शेजारीच घारसे यांचे गोडाऊन आहे.दरम्यान आज आज पहाटे अचानक आग लागली.
आगीने रौद्र रूप धारण केले होते.बॅकेच्या एटीएमच्या सुरक्षारक्षकाला आग लागल्याचे लक्षात आले.त्याने तातडीने संपर्क साधून माहिती दिली.तसेच अग्निशमन दलाने ही धाव घेतली.खाजगी टँकरने पाणी घटनास्थळ आले.अखेर अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.तसेच पालिकेच्या जेसीपी व दोन टॅक्टरच्या मदतीने गोडाऊन मधील जळीत व चांगले साहित्य बाहेर काढण्यात आले. नगराध्यक्ष मोहनलाल माळी,अभिनंदन सालपे,सुधाकर पिसे आदींसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाचे प्रशांत आवळे, गणेश नायकवडी फायरमॅन अंकुश कदम केतन धनवडे सुशांत आवळे ,महेश पाटील, अजित पाटील यांनी मदत कार्यात सहकार्य केले.यामध्ये मोठ्या प्रमाणात खते बियाणे रासायनिक औषधे आदींचे नुकसान झाले.तर तर काही साहित्य वाचविण्यात यश आले.