आगीचे लोट अन् धुराचे साम्राज्य -मोरेवाडीच्या माळावरील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 07:38 PM2019-02-22T19:38:53+5:302019-02-22T19:40:51+5:30
मोरेवाडी (ता. करवीर) येथील गायरानामध्ये भारती विद्यापीठाजवळ लागून असलेल्या माळावर उघड्यावरच टाकलेल्या कचºयाला आग लागल्यामुळे सर्वत्र आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरले
ज्योती पाटील ।
पाचगाव : मोरेवाडी (ता. करवीर) येथील गायरानामध्ये भारती विद्यापीठाजवळ लागून असलेल्या माळावर उघड्यावरच टाकलेल्या कचºयाला आग लागल्यामुळे सर्वत्र आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामध्ये असणाºया विविध प्रकारचा कचरा व कातडी जळाल्याचा वास पसरत असल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. कचºयापासून कंपोस्ट खत निर्मितीचा प्रस्ताव अद्यापही धूळ खात पडल्याने कचºयाची विल्हेवाट लागणार की नाही, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक व वाहनधारकांतून विचारला जात आहे.
चित्रनगरी परिसर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी, अष्टविनायक पार्क, के.एम.टी. कॉलनी, धन्वंतरी कॉलनी या परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरत असून, येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीने गोळा केलेला कचरा पसरत असल्याने कचरा जाळून टाकण्याचा खटाटोप ग्रामपंचायतीमार्फत केले जातात. परंतु, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर भीषण परिणाम होताना पाहावयास मिळत आहेत.
या कचºयातील कुजलेले अन्न, ओला कचरा,प्लास्टिक कचरा तसेच धन्वंतरी कॉलनीमध्ये असलेल्या चपलच्या कारखान्यातील कातड्याचे तुकडेदेखील या कचºयाच्या ढिगात टाकले जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरतेच; परंतु याचा लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. या परिसरात असणाºया नामांकित भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे शिक्षणासाठी बाहेरून आलेले विद्यार्थी विद्यापीठाच्या आसपास असणाºया वसतिगृहाचा आसरा घेतात; परंतु वसतिगृहावर दिवस-रात्र धुराचे लोट येत असल्याने त्यांना राहणे मुश्कील झाले
आहे.
जवळजवळ तीन-चार टन गोळा केलेला कचरा दररोज या ठिकाणी आणून टाकला जातो. अनेक वर्षांपासून कचºयाचे ढीग येथे असल्याने त्यासंदर्भात अनेकवेळा आंदोलने, तक्रारी शासन स्तरावर झाल्या; परंतु कचरा प्रकल्प अद्यापही कागदोपत्रीच अडकला आहे. हा कचरा प्रकल्प लवकरात लवकर करावा, अशी मागणी येथील रहिवासी व वाहनधारकांतून जोर धरू लागला आहे.
घसादुखी
कचºयातील कुजलेले अन्न, प्लास्टिक व चप्पल कारखान्यातील कातडी जळालेल्या दुर्गंधीमुळे व धुरामुळे डोळ्यांची जळजळ, खोकला, घसादुखी व श्वसनाचे आजार उद्भवले आहेत.
गेली अनेक वर्षांपासून या कचºयामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागत असून, आता गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. अनेकजण आजारांशी सामना करीत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकवेळा लेखी तक्रार करूनदेखील प्रशासनाला जाग येत नाही.
- चंद्रकांत बराले, नागरिक
वर्षानुवर्षे आम्हाला या कचºयामुळे त्रास होत आहे. आमच्या घराच्या मागच्या बाजूस हा कचरा ढीग असल्याने आमचे घर कचरा डेपोतच आहे, असे वाटते. तसेच जळालेल्या कचºयाचा धूर नेहमी घरात आल्याने लहान मुलांना गंभीर स्वरुपाचे आजार उद्भवले आहेत. - शंकर सातपुते, नागरिक