निपाणीतील हालशुगर कारखान्यात आग, एक कोटीचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 01:50 PM2023-01-20T13:50:11+5:302023-01-20T13:50:34+5:30
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक विभागाने प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली
निपाणी : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला आग लागून तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. निपाणी, चिकोडी, कागल संकेश्वर या भागातील अग्निशामक दलाने धाव घेऊन वेळीच आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
या घटनेचे अधिक माहिती की, गुरुवारी सकाळी कारखाना स्थळावर बगॅस विभागात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आगीमुळे रबरी बेल्टने पेट घेतल्याने आगीने हळूहळू रौद्र रूप धारण केले. या आगीत कारखान्याचे ३५ लाखांचे बगॅस, तर ६५ लाखांची मशिनरी जळून खाक झाली.
आग लागल्याचे निदर्शनास येताच कारखाना प्रशासनाने निपाणी, संकेश्वर कागल, चिकोडी येथील अग्निशामक दलांना या घटनेची माहिती दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक विभागाने प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम. पी. पाटील यांच्यासह सर्व संचालकांनी घटनस्थळी भेट पाहणी दिली.