कागलमध्ये अग्निशमन दलाने कर्नाटकातील एकाला वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 02:03 PM2019-08-08T14:03:42+5:302019-08-08T15:02:48+5:30
कोवाड मधील पुरात अडकलेल्या किणी रोडवरिल 24 नागरीकांना आज बेळगाव मिल्ट्री च्या मदतीने बाहेर काढण्यास चंदगड प्रशासनाला यश , स्वतः नायब तहसिलदार नांगरे ऑपरेशन वेळी हजर , पुरस्थिती कायम , घरांची पडझड सुरु , पावसाचे थैमान कायम , वीज नाही , मोबाईल रेंज नाही , नागरीक हैरान
कोल्हापूर -कागलमध्ये अग्निशमन दलाने कर्नाटकातील एकाला वाचवले. कोगनोळी टोल नाक्याकडून दुधगंगा नदीच्या पुलावरून आयबीपी पेट्रोल पंपापर्यंत पाण्यातून चालत आलेला एकजण पाण्याच्या दाबाने वाहून जात होता. मात्र तो झाडाला धरून बसला. ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पालिकेत फोन करून सांगितले. अग्निशमन दलाने शिडी टाकून त्याला बाहेर घेतले.
कोवाड मधील पुरात अडकलेल्या किणी रोडवरिल 24 नागरीकांना आज बेळगाव मिल्ट्री च्या मदतीने बाहेर काढण्यास चंदगड प्रशासनाला यश , स्वतः नायब तहसिलदार नांगरे ऑपरेशन वेळी हजर , पुरस्थिती कायम , घरांची पडझड सुरु , पावसाचे थैमान कायम , वीज नाही , मोबाईल रेंज नाही , नागरीक हैरान
*गांधीनगर सह 14 गावात पिण्याच्या पाण्याची गैरसोय गेले तीन दिवस पाणीच नाही आले
*केळोशी खुर्द ( ता. राधानगरी ) येथील ५० एकर जागे एवढा भला मोठा डोंगर खचला या दोन गावांची पिण्याच्या पाण्याची स्किम ही खचली आहे .