कचऱ्याला लागलेली आग घरापार्यंत आल्याने साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 09:34 PM2019-12-17T21:34:25+5:302019-12-17T21:34:46+5:30

मोरेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गोळा होणार कचरा भारती विद्यापीठ जवळ असणाऱ्या माळरानावर टाकण्यात येतो अनेक वर्षांपासून येथे पडलेला कचरा नेहमीच धुमसत असतो . रात्री अपरात्री जीव मुठीत धरूनच राहावे लागते,अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करून देखील येथील नागरिकांची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे,

As the fire burns to the house, burn the materials | कचऱ्याला लागलेली आग घरापार्यंत आल्याने साहित्य जळून खाक

कचऱ्याला लागलेली आग घरापार्यंत आल्याने साहित्य जळून खाक

googlenewsNext
ठळक मुद्देमोरेवाडीच्या माळावर

पाचगाव  :  मोरेवाडी ता करवीर येथील माळावर भारती विद्यापीठाच्या बाजूला टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याने बेघर वसाहतीतील एका  घरातील साहित्य जाळून खाक झाले,अचानक मंगळवारी दुपारी आग लागल्याने वकच हाहाकार उडाला व आग रस्त्या शेजारील घरापर्यंत आली तसेच संगीता पुईगडे यांच्या घराच्या पाठीमागे ठेवलेले सामान जाळून खाक झाले त्यामुळे येथील रहिवाशी भयभीत झाले, तात्काळ अग्निशमन दलाला कळवून अग्निशामनाची गाडी मागवून आग आटोक्यात आणली,आग लागताच  लोकांनी प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मोरेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गोळा होणार कचरा भारती विद्यापीठ जवळ असणाऱ्या माळरानावर टाकण्यात येतो अनेक वर्षांपासून येथे पडलेला कचरा नेहमीच धुमसत असतो व  याठिकाणी धुराचे साम्राज्य पसरलेले असते,याअगोदर देखील आग लागल्याने येथील रहिवाशांचे नुकसान झाले आहे, रात्री अपरात्री जीव मुठीत धरूनच राहावे लागते,अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करून देखील येथील नागरिकांची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे,संबंधित प्रशासनाकडे याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले.                    

 

    रोजंदारीवरच आमचा उदरनिर्वाह चालू आहे त्यात घरी कोणी पुरुष मंडळी नसल्याने सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे,घराची पडझड झल्याने शेड मारण्यासाठी गोळा केलेले साहित्य या आगीत भस्मसात झाले आहे,या अगोदर दोन वेळा असे प्रकार घडल्यानंतर संबंधित प्रशासनाला याची कल्पना दिली होती तरीसुद्धा अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही, तसेच याठिकाणी मृत जनावरे व मेलेली कुत्री आणून टाकल्याने नेहमी दुर्घदी पसरलेली असते,रात्री अपरात्री आग लागण्याची शक्यता असल्याने जीव मुठीत धरूनच राहावे लागते,   

 संगीता उत्तम पुईगडे ,रहिवाशी,बेघर वसाहत.

    

येथील कचरा विघटन करण्याचा मोठा प्रश्न असून आम्ही अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खड्डा मारण्याची परवानगी मागितली आहे व त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे परंतु शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून आशा समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे,याची शासनाने तातडीने दखल घ्यावी.

  अमर मोरे  , माजी सरपंच मोरेवाडी व विद्यमान सदस्य,        

Web Title: As the fire burns to the house, burn the materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.