फटाका विक्रीचा बार फुसका

By admin | Published: October 23, 2014 11:48 PM2014-10-23T23:48:18+5:302014-10-23T23:48:41+5:30

प्रदूषण मंडळ, सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांना यश

Fire the cracker sales bar | फटाका विक्रीचा बार फुसका

फटाका विक्रीचा बार फुसका

Next

कोल्हापूर : दरवाढ आणि जास्त क्षमतेच्या आवाजाचे फटाके तयार करण्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंधने घातल्यामुळे यावर्षी फटाक्यांच्या बाजारपेठेचा बार फुसकाच ठरला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या खरेदीमध्ये
सुमारे पंचवीस टक्के घट झाली. शोभेची दारू आणि हायड्रो बॉम्ब, फुलबाजे, किटकॅट, रॉकेटच्या दरांत मागील वर्षापेक्षा सरासरी १५ टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
फटाक्यांऐवजी शोभेच्या दारूवरच ग्राहकांनी भर दिल्याचे चित्र या बाजारपेठेत दिसले. विविध संस्था-संघटनांनी केलेल्या आवाहनाला यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. फटाके फोडल्यामुळे ध्वनिप्रदूषण, हवाप्रदूषणाची समस्या तीव्र होते. फटाक्यांच्या आवाजामुळे हृदयरुग्ण तसेच लहान बालकांवर विपरित परिणाम होतो. फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामधून श्वसनाचे विविध आजार उद्भवतात. पर्यावरणवादी संघटना तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विविध धार्मिक संस्थांनी दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देवदेवतांची होणारी विटंबना, आरोग्य आणि पर्यावरणाची हानी, आदी मुद्द्यांवर नागरिकांनी दिवाळीत फटाके फोडू नयेत, असे आवाहन विविध संघटनांतर्फे करण्यात आले होते. याचाही परिणाम फटाक्यांच्या बाजारपेठेवर झाला आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
फटाक्यांसाठी येणारा खर्च गरजू व्यक्ती, अनाथाश्रम, वृद्धाश्रम तसेच गरिबांसाठी वापरण्याचे आवाहनही या संघटनांनी केले होते. टाकेविरहित दिवाळी साजरी करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जैन सोशल गु्रप, सनातन संस्था तसेच शहरातील विविध पर्यावरणवादी संघटनांनी विशेष प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

ंंविक्री मंदावण्याची कारणे
दरात झालेली १५ टक्के वाढ
विविध संघटनांनी केलेली जनजागृती
पर्यावरण रक्षणाचे वाढते महत्त्व
फटाक्यांच्या पैशातून
सामाजिक कार्य

Web Title: Fire the cracker sales bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.