कुदनूरमधील आगीत साॅमिल, ऑईल मिल-फॅब्रिकेटर्स कारखाना खाक, अंदाजे ७० लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 12:54 PM2023-01-01T12:54:12+5:302023-01-01T12:55:54+5:30

नववर्षारंभी सुतार कुटुंबावर कोसळले मोठे संकट

Fire destroys oil mill fabricators factory in Kudnoor damages estimated at Rs 70 lakh | कुदनूरमधील आगीत साॅमिल, ऑईल मिल-फॅब्रिकेटर्स कारखाना खाक, अंदाजे ७० लाखांचे नुकसान

कुदनूरमधील आगीत साॅमिल, ऑईल मिल-फॅब्रिकेटर्स कारखाना खाक, अंदाजे ७० लाखांचे नुकसान

Next

निंगाप्पा बोकडे
चंदगड: साॅमील, ऑईल मिल व फॅब्रिकेटर्स कारखान्याला रविवारी चारच्या सुमारास आग लागून अंदाजे ७० लाखांचे नुकसान झाल्याची घटना कुदनूर येथे घडली. नववर्षाच्या आरंभीच या घटनेमुळे सुतार कुटुंबावर मोठं संकट कोसळेल आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

कुदनूर (ता. चंदगड) येथील शशिकांत शिवराम सुतार, गजानन सुतार, तुकाराम सुतार, दिलीप सुतार व जानबा सुतार यांच्या मालकीच्या सिद्धेश्वर सॉमिल, सिद्धेश्वर ऑईल मिल व शिवराम फॅब्रिकेटर्स यानावाने मोठा व्यवसाय सुरू केला होता. ही तिन्ही ठिकाणं लागून असल्याने सर्वच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. कारखान्यात ठेवलेल्या दोन दुचाकी ही जळून खाक झाल्या असून बांधलेल्या दोन बकरीही होरपळून गेल्या. कारखान्यांना लागलेल्या भीषण आगीत अंदाजे सुमारे ७० लाखांचे नुकसान झाले. या आगीत कारखान्यात बांधलेली दोन बकरी व दोन मोटर सायकलही जळून खाक झाल्या. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लाकूड व तेल साठल्यामुळे भीषण आग लाकूड व तेल साठ्यामुळे काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. गडहिंग्लज नगर परिषदेचा अग्निशमक बंब येईपर्यंत तिन्ही कारखाने आगीच्या भक्षस्थानी पडले होते. लाकूड व तेलाच्या साठ्यामुळे आग भीषण होती. यावेळी ग्रामस्थांनीही जीवाची बाजी लावत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आत गॅस सिलेंडर असल्याचे समजल्यामुळे यावरही भीतीमुळे मर्यादा आल्या. तिन्ही कारखान्यांची मशिनरी, विद्युत मीटरसह मोठा लाकूड साठा, तेल काढण्यासाठी आणलेल्या शेंगा व काढलेले तेल फॅब्रिकेटर्स व्यवसायासाठी आणलेल्या लोखंड, ट्रॅक्टर ट्रॉली व शेड इमारत आगीच्या भक्षस्थानी पडले.

दोन व्यक्तींचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 
गेल्या काही वर्षात सुतार बंधूनी येथे शिवराम ट्रॅक्टर ट्रॉली बनवण्याचा उद्योग सुरू केला होता. त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आगीची सुरुवात पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांनी दाखवत असून त्यानंतर हा कॅमेराही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी तेथे दोन व्यक्तींचा वावर असल्याचे अस्पष्ट दिसते असे सुतार बंधू यांनी सांगितले. घटनेच्या रीतसर पंचनामा सकाळी झाला.

एकंदरीत नववर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सकाळपासून घटनास्थळी कुदनूर परिसरातील शेकडो नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. घटनास्थळी माजी रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील तसेच अन्य राजकीय व्यक्तींनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Fire destroys oil mill fabricators factory in Kudnoor damages estimated at Rs 70 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.