शित्तूर-वारुण येथील डोंगर रानास लागलेल्या आगीत वैरण खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:22 AM2021-04-05T04:22:23+5:302021-04-05T04:22:23+5:30

ही आग विझविण्याचा ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. पावसाळ्यामध्ये जनावरांसाठी राखून ठेवलेल्या ठकू झोरे यांची ...

In the fire that engulfed the mountain forest at Shittur-Varun, fodder was destroyed | शित्तूर-वारुण येथील डोंगर रानास लागलेल्या आगीत वैरण खाक

शित्तूर-वारुण येथील डोंगर रानास लागलेल्या आगीत वैरण खाक

googlenewsNext

ही आग विझविण्याचा ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. पावसाळ्यामध्ये जनावरांसाठी राखून ठेवलेल्या ठकू झोरे यांची पिंजराची गंज, दहा हजार गवताची कट, कडबा व वर्षभराचे सरपण या आगीच्या भस्मसात जळून खाक झाले. त्यामुळे जनावरांना जगवायचे कसे? हा मोठा प्रश्न झोरे यांना पडला आहे.

शित्तूर-वारुण परिसरातील डोंगररांगांना आग लागण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अज्ञातांकडून लावण्यात येत असलेल्या आगीमुळे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे.

फोटो:

शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) पैकी राघूचा धनगरवाडा येथील ठकू झोरे यांची जळून खाक झालेली वैरण. (छाया : सतीश नांगरे)

Web Title: In the fire that engulfed the mountain forest at Shittur-Varun, fodder was destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.