काटेभोगाव येथील वैरणीच्या गोदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:22 AM2021-03-07T04:22:27+5:302021-03-07T04:22:27+5:30
कळे : काटेभोगाव ( ता. पन्हाळा ) येथील बाबा रेडीकर गोगीता सेवा संस्थेच्या गोदामाला शुक्रवार ( ...
कळे : काटेभोगाव ( ता. पन्हाळा ) येथील बाबा रेडीकर गोगीता सेवा संस्थेच्या गोदामाला शुक्रवार ( दि. ५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने वर्षभरासाठी साठवून ठेवलेले गवत जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. गोदामाची जागा अंडरग्राउंड असून, वरती लागूनच गायींचा गोठा आहे. तातडीने कार्यकर्त्यांनी गायी गोठ्यातून बाहेर काढल्या. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. रात्रभर आग धुमसत होती. आगीची तीव्रता एवढी होती की, इमारतीच्या स्लॅब, दगडांना उष्णतेने तडे गेले आहेत. आगीत ६ लाख ६० हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गोशाळेमध्ये लहान-मोठी दीडशे देशी गोवंश आहे. याबाबतची फिर्याद संस्था सदस्य सरदार श्रीपती आंग्रे ( रा. काटेभोगाव, ता. पन्हाळा) यांनी कळे पोलिसांत दिली आहे.
बत फोटो मेल केला आहे -
काटेभोगाव, ता. पन्हाळा येथील बाबा रेडिकर गोगीता सेवा संस्थेच्या वैरणीच्या गोदामाला भीषण आग लागल्याने गोदाममधील गवत जळून खाक.