शिवाजी विद्यापीठातील ‘सिंथेटिक ट्रॅक’ परिसरात आग, स्वच्छत करताना घडला प्रकार; कर्मचाऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 03:12 PM2017-11-30T15:12:02+5:302017-11-30T15:21:02+5:30
शिवाजी विद्यापीठातील सिंथेटिक ट्रॅकच्या परिसरात गुरुवारी सकाळी आग लागली. या ट्रॅक आणि त्याच्या परिसरातील स्वच्छतेचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. आग आटोक्यात आणण्यासाठी येथील विद्यापीठाच्या कर्मचारी, काही विद्यार्थ्यांची धावपळ उडाली.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सिंथेटिक ट्रॅकच्या परिसरात गुरुवारी सकाळी आग लागली. या ट्रॅक आणि त्याच्या परिसरातील स्वच्छतेचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. आग आटोक्यात आणण्यासाठी येथील विद्यापीठाच्या कर्मचारी, काही विद्यार्थ्यांची धावपळ उडाली.
या ट्रॅकवर शनिवार (दि. २) पासून मैदानी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी संयोजकांनी शिवाजी विद्यापीठाकडून हा ट्रॅक भाडेतत्त्वावर वापरण्यास घेतला आहे. त्याच्या स्वच्छतेचे काम संयोजकांनी एका ठेकेदाराला दिले आहे.
याअंतर्गत स्वच्छतेचे काम सुरू आहे. ट्रॅक परिसरातील वाळलेल्या गवत नष्ट करण्यासाठी स्वच्छतेचे काम करणाऱ्या एकाने येथील गवत पेटविले. या गवताला लागलेली आग काही क्षणात ट्रॅकच्या परिसरात वेगाने पसरली.
आग लागलेल्या ठिकाणाहून पाच ते सहा मीटर सिंथेटिक ट्रॅक होता. त्याचे नुकसान होवू नये म्हणून याठिकाणी स्वच्छतेसाठी कार्यरत असलेल्या कामगारांसह विद्यापीठाचे कर्मचारी, काही विद्यार्थ्यांनी आगीवर तातडीने पाणी मारले आणि पुढील नुकसान टाळले.
दरम्यान, या स्पर्धेसाठी गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडून या ट्रॅकच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. या घडलेल्या प्रकाराची माहिती आणि अहवाल कुलसचिवांना सादर केला असल्याचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड यांनी सांगितले.