रुकडी येथे महालक्ष्मी रेल्वेचे ब्रेक जाम झाल्याने स्पार्क, प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 22:46 IST2025-02-13T22:45:46+5:302025-02-13T22:46:26+5:30

गाडीचा ब्रेक डिस्कला चिकटल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग विझवून गाडी पुढे मार्गस्थ झाल्याचे स्टेशन मास्टरने सांगीतले.

Fire under train bogie near Rukdi in Kolhapur, train stopped due to chain being pulled | रुकडी येथे महालक्ष्मी रेल्वेचे ब्रेक जाम झाल्याने स्पार्क, प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली

प्रतिकात्मक फोटो

अभय व्हनवाडे -

कोल्हापूर हून मुंबईकडे जाताना रूकडी-वळिवडे दरम्यान महालक्ष्मी रेल्वेचे ब्रेक (बायडींग) जाम झाल्याने स्पार्क निर्माण झाला आणि ठिणग्या उडाल्याची घटना घढली. ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेची चेन  ओढली. यानंतर रेल्वे पंचगंगा फूलावर थांबली. दरम्यान, रेल्वेस आग लागल्याची बातमी प्रवाशांमध्ये पसरल्याने त्यांच्यात घबराट निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दि.१३ रोजी रात्रो ९ वाजण्याच्या समारास कोल्हापूर हून  महालक्ष्मी रेल्वे रुकडी (जेआरएनटी) वळिवडे दरम्यान पंचगंगा फूलानजीक आली असता  वातानुकूलित (एमटू) बोगीचे चाक जाम होवून रूळाशी घर्षण  झाल्याने ठिणग्या उडाल्या. दरम्यान ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेची चेन ओढून गाडी थांबवली. ही बाब रेल्वे वाहक गार्ड यांच्या लक्षात येताच त्यांनी चाक ब्रेक दुरूस्त केले. यानंतर  गाडी  मुंबईकडे  मार्गस्थ झाली .
 

Web Title: Fire under train bogie near Rukdi in Kolhapur, train stopped due to chain being pulled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.