विद्यार्थ्यांना मिळणार प्रथमोपचाराचे धडे
By Admin | Published: February 10, 2016 12:45 AM2016-02-10T00:45:25+5:302016-02-10T01:00:20+5:30
आरोग्य विभागाचा उपक्रम : १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या जनजागृतीला प्रारंभ
गणेश शिंदे -- कोल्हापूर --दोन वर्षे यशस्वी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेने (१०८ सेवा) कात टाकण्यास सुरुवात केली आहे. ही सेवा पुढील काळात माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयासह सरपंच, पोलीस पाटील आणि राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) चालक व वाहकांना योग्य प्रथमोपचार प्रशिक्षणाचे धडे देणार आहे.
याचा फायदा एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी होणार आहे. तिच्या जनजागृतीला सुरुवात झाली आहे.सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान याअंतर्गत ही १०८ ही टोल फ्री रुग्णसेवा राज्यात दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी असे चार जिल्हे येतात. या रुग्णवाहिकेमध्ये आठ अॅडव्हॉन्स्ड बाईक सपोर्ट व २८ मूलभूत प्रथमोपचार रुग्णसेवा आहेत. अॅडव्हान्स्ड बाईक सपोर्ट या सेवेमध्ये कार्डियाक मॉनिटर, व्हेंटिलेटर, इन्फ्युजन पंप, सिरीज पंप या अत्यंत महत्त्वाच्या यंत्रणा, तर ाूलभूत प्रथमोपचार रुग्णसेवेमध्ये औषधे, वेगवेगळी स्ट्रेचर व अन्य उपकरणे आहेत. कोल्हापुरात सीपीआर, कसबा बावडा (सेवा रुग्णालय), सावित्रीबाई फुले रुग्णालय, पुलाची शिरोली, उचगाव प्राथमिक केंद्र, कागल ग्रामीण रुग्णालय, आदी ठिकाणी ही १०८ रुग्णसेवा असते. रुग्णवाहिकेमध्ये दोन प्रशिक्षित चालक, प्रशिक्षणार्थी डॉक्टर तीन शिफ्टनुसार काम करतात.
एखाद्या घटनेची अचूक माहिती, घटनास्थळाचा पत्ता, आदी माहिती समजावी व जखमींवर तत्काळ प्रथमोपचार करावेत यासाठी आता माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये यांच्यासह सरपंच, उपसरपंच तसेच राज्य परिवहन महामंडळाचे चालक व वाहक यांना प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यातील तरुण पिढीला याचा निश्चितच फायदा होईल, हा या पाठीमागील उद्देश आहे.
सध्या जिल्'ात ३५ ते ४० हजार जणांमध्ये याबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्'ापाठोपाठ इतर तीनही जिल्ह्यात प्रथमोपचार प्रशिक्षण जनजागृती करण्याचा आपत्कालीन सेवेचा
मानस आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सध्या प्रत्येक गावा-गावांत योग्य रुग्णांवर प्रथमोपचार का व कसे करावेत, त्यांचे फायदे काय, या विषयी सर्व थरातून जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी सरपंचांसह पोलीसपाटील यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. लवकरच याचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या आठ-दहा महिन्यांत प्रत्यक्षात प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देणार आहोत.
- डॉ. संतोष मोरे, विभागीय प्रबंधक, १०८ सेवा, कोल्हापूर सर्कल.
दृष्टिक्षेपात...
जिल्हा१०८
रुग्णवाहिका
कोल्हापूर३६
सांगली२४
सिंधुदुर्ग१०
रत्नागिरी१७
लोकांना आवाहन...
आपल्या तालुक्यातील नजीकच्या १०८ रुग्णवाहिकेची माहिती करून घ्या.
आपत्कालीन परिस्थितीतच १०८ वर संपर्क साधा.
कॉल केल्यावर प्रथम प्राथमिक माहिती अचूक सांगा. (उदा. आपले नाव, जिल्हा, तालुका, गावाचे नाव, घटनास्थळाचे संकेतस्थळ, आदी.)
घटनास्थळी पोहोचेपर्यंत आपला ाोबाईल व्यस्त ठेवू नये.
घटनास्थळी पोहोचेपर्यंत आपणास प्रथमोपचार येत असल्यास चालू करावा.