पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी

By admin | Published: May 21, 2015 12:52 AM2015-05-21T00:52:00+5:302015-05-21T00:55:28+5:30

तेजश्री चौगले : घरची जबाबदारी सांभाळून दररोज सात ते आठ तास अभ्यास

In the first attempt, the Yashaba is celebrated | पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी

पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी

Next

कोल्हापूर : बारावी सायन्सनंतर डी. एड्. आणि बी. ए. करून स्पर्धा परीक्षेकडे वळलेल्या माजगांव (ता. राधानगरी) येथील तेजश्री चौगले हिने पहिल्याच प्रयत्नात पीएसआय परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे.
तेजश्री हिचे शालेय शिक्षण माहेर असलेल्या मारडी (जि. सातारा) येथे झाले. दहिवडी कॉलेजमध्ये तिने बारावी (विज्ञान) पूर्ण केली. त्यानंतर डी. एड्. आणि बी.ए.ची पदवी मिळविली. शिक्षण सुरू असतानाच तिचा विवाह झाला. येळवडे (ता. राधानगरी) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तिचे पती विनायक यांनी तिला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
गेल्यावर्षीपासून तिने अभ्यास सुरू केला. विनायक हे स्वत: देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. त्यांच्या आणि कोल्हापुरातील एन. पी. स्पर्धा परीक्षा केंद्राचे नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. परीक्षेची तयारी करताना तिने पीएसआयचे ध्येय बाळगले. त्यानुसार दिवसातील सात ते आठ तास अभ्यास केला. त्याच्या जोरावर तिने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. (प्रतिनिधी)


हॉस्पिटलमध्ये आनंदोत्सव...
तेजश्रीचे पती विनायक काल, मंगळवारपासून कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तेजश्रीचे यश समजताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. तिचे सासरे विश्वास चौगले, नणंद रुपाली नलवडे, दाजी संग्राम नलवडे यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन तेजश्री आणि तिचे मार्गदर्शक नितीन पाटील यांना पेढा भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान, तेजश्रीच्या यशाबाबत विनायक म्हणाले, दोन वर्षांची मुलगी आणि घरची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून तिने यश मिळविले आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळविल्याचा खूप आनंद झाला.

Web Title: In the first attempt, the Yashaba is celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.