माणगाव येथे जिल्ह्यातील पहिले बाल कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:18 AM2021-06-10T04:18:06+5:302021-06-10T04:18:06+5:30
माणगाव येथील एपीएम हायस्कूलच्या येथील इमारतीत स्व. सरोजदादा पाटील सभागृहात मुलांच्याकरिता जिल्हात प्रथमच कोविड सेंटर सज्ज होत आहे. येथील ...
माणगाव येथील एपीएम हायस्कूलच्या येथील इमारतीत स्व. सरोजदादा पाटील सभागृहात मुलांच्याकरिता जिल्हात प्रथमच कोविड सेंटर सज्ज होत आहे. येथील वेगळेपणा व आल्हाददायक वातावरण, निसर्गरम्य परिसरने लहान मुलाच्यातील भीती निघून जावी या करिता करण्यात आलेले रचना व निर्मिती जिल्ह्यासाठी आदर्श ठरणार असल्याची प्रमुखांनी भावना व्यक्त केल्या.
येथे बालरुग्णसाठी स्वतंत्र खेळण्याचे साहित्य, दूरदर्शन संच, जेवणाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. बालकांकडे विशेष लक्ष देता यावे याकरिता स्वतंत्र शल्यविशारद, देखरेखीसाठी स्वतंत्र काळजीवाहक तसेच माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने १० ऑक्सिजन बेडसहित ३५ बेडचे कोविड केअर सेंटर व लहान मुलांचे १५ बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी, माणगावचे सरपंच राजू मगदूम, जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंग चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, हातकणंगले पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, जवाहर कारखाना संचालक जिनगोंडा पाटील, नगराध्यक्ष डॉ. नीता माने, उपसरपंच अख्तरहुसेन भालदार, मुख्याध्यापिका एम. व्ही. कदम, अनिल पाटील, आय. वाय. मुल्ला, यांच्यासह सर्व ग्रा. पं. सदस्य, आरोग्य केंद्रातील आशासेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.