CoronaVirus Positive News इचलकरंजीतील पहिल्या कोरोना मुक्त बालकास टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 06:31 PM2020-05-05T18:31:48+5:302020-05-05T18:35:14+5:30
कोल्हापूर : इचलकरंजीमधील चार वर्षीय बालकाचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्याला आयजीएम रूग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात ...
कोल्हापूर : इचलकरंजीमधील चार वर्षीय बालकाचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्याला आयजीएम रूग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज देण्यात आला. हातकणंगले येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात सध्या पाठवण्यात आले आहे.रुग्णालयाचे प्रशासन अधिकारी महेश महाडीक यांनी याबाबत माहिती दिली.
इचलकरंजी मधील पहिल्या कोरोना बाधित रुग्ण असणाऱ्या आजोबांच्या संसर्गात हा चार वर्षीय नातू आला होता. २० एप्रिलरोजी त्याला आयजीएममध्ये दाखल करुन त्याचा स्त्राव, घेतला होता. तो पॉझीटिव्ह आला होता.
वैद्यकीय अधीक्षक रवीकुमार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञ संदीप मिरजकर आणि स्त्राव शोएब मोमीन आणि त्यांचे पथक या बालकावर उपचार करत होते. १४ दिवसानंतर म्हणजे दि ३ मे आणि ४ मे रोजी घेतलेल्या दोनी स्त्राव बचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाला.
आज बुधवार ५ वाजण्याच्या दरम्यान रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात बालकाला निरोप दिला. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, पोलीस उप अधीक्षक गणेश बिरादार, मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी या बालकाला तसेच त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे पुष्पगुच्छ देवून कौतुक केले.