पहिल्या दिवशी ‘चरणस्पर्श’

By admin | Published: February 1, 2015 01:05 AM2015-02-01T01:05:48+5:302015-02-01T01:33:29+5:30

अंबाबाईचा किरणोत्सव : भाविकांची गर्दी

On the first day, 'Phase Sparsh' | पहिल्या दिवशी ‘चरणस्पर्श’

पहिल्या दिवशी ‘चरणस्पर्श’

Next

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज, शनिवारी सूर्यकिरणांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. ढगाळ वातावरणामुळे काहीशी तांबूस किरणे सायंकाळी सव्वासहा वाजता चरणस्पर्श करून वर सरकली.
किरणोत्सवाला आज, शनिवारपासून प्रारंभ झाला. पूर्वी किरणोत्सव पाच दिवस व्हायचा. आता तीन दिवस पाहिला जातो. महाद्वारातून थेट गाभाऱ्यात किरणे पोहचतात. आज सायंकाळी ६ वाजून २ मि. कासव चौकातून किरणांनी एक-एक पायरी पूर्ण करीत सव्वासहा वाजता मूर्तीचा चरणस्पर्श केला, अशी माहिती ‘केआयटी’चे प्राध्यापक हिरासकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: On the first day, 'Phase Sparsh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.