करंबळी येथे झाले पहिले नेत्रदान
By admin | Published: September 17, 2014 12:50 AM2014-09-17T00:50:41+5:302014-09-17T00:51:50+5:30
चळवळीतले तेरावे : सलपे कुटुंबीयांचा आदर्शवत निर्णय
गडहिंग्लज : नेत्रदान चळवळीतील करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील कार्यकर्ते संतोष गणू सलपे (वय ३२) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. सलपे कुटुंबीयांनी आदर्शवत निर्णय घेतानाच समाजासमोर कृतिशील वस्तूपाठ घालून दिला. करंबळीतील पहिले, तर चळवळीतील हे तेरावे नेत्रदान ठरले.
अत्याळ (ता. गडहिंग्लज) ग्रामस्थांनी राजकीय गट तट बाजूला ठेवून एकत्र येत दोन वर्षांपूर्वी मरणोत्तर नेत्रदान चळवळीची सुरुवात केली. गावात आतापर्यंत ११ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. अत्याळपाठोपाठ शेजारच्या बेळगुंदी गावातही महिनाभरापूर्वी एक नेत्रदान झाले आहे. करंबळी ग्रामस्थांनी एकत्र येत सव्वा वर्षापूर्वी गावात चळवळीची सुरुवात केली. प्रबोधनाच्या पातळीवर काम सुरू असले तरी प्रत्यक्ष नेत्रदान मिळाले नव्हते. करंबळीत नेत्रदान चळवळ सुरू करण्यात संतोष सलपे आघाडीवर होते. घरोघरी जाऊन ग्रामस्थांना नेत्रदानाचे महत्त्व समजावून देण्याचे कामही त्यांनी केले होते. दुर्दैवाने अल्पशा आजाराने त्यांचे सोमवारी (दि. १६) दुपारी निधन झाले.
येथील डॉ. घाळी महाविद्यालयात लिपीक म्हणून कार्यरत असणारे त्यांचे मोठे बंधू भैरू सलपे यांनी संतोष यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. येथील अंकुर आय हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने नेत्रगोल काढण्याची प्रक्रिया पार पाडली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ,
भावजय असा परिवार आहे.
(प्रतिनिधी)