यंदा ३४०० रु.चा पहिला हप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:28 AM2017-10-02T00:28:34+5:302017-10-02T00:28:51+5:30

This is the first installment of Rs. 3400 | यंदा ३४०० रु.चा पहिला हप्ता

यंदा ३४०० रु.चा पहिला हप्ता

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढविली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांना यंदा किमान ३४०० रुपयांचा पहिला हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊसदरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित रयत क्रांती संघटनेच्या पहिल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सिनेअभिनेता राहुल सोलापूरकर यांची खास उपस्थिती होती.
खोत म्हणाले, रयत क्रांती संघटना कोणाची संघटना मोडण्यासाठी नसून, ती शेतकºयांचा संसार उभारण्यासाठी आहे. तसेच माझ्या जाण्याने स्वाभिमानीचा टवकाही उडला नाही म्हणणाºयांना खिंडार पडल्याचा टोलाही यावेळी खोत यांनी लगावला. वेगवेगळे आरोप करून माझ्यामुळेच शेतकºयांचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका होत आहे. पण ३२ वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून फक्त शेतकºयांसाठी लढलो असून, त्यासाठी कोणी निष्ठेचे सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. जनतेने राजीनामा मागितल्यास हजारवेळा राजीनामा देईन, पण मी गड सोडून पळणारा नव्हे, तर लढणारा कार्यकर्ता आहे. माझा राजीनामा मागण्याचा हक्क केवळ शेतकºयाला असून, कोणीतरी सांगतो म्हणून मी राजीनामा देणार नाही.
देशात सरासरी २३५ ते २४५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. मात्र, गरज २५० ते २६० लाख मेट्रिक टन इतकी आहे. गरजेपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने साखरेचे दर स्थिर राहणार आहेत. शिवाय एफआरपीनुसार ९.५ टक्के साखर उताºयासाठी २५५०, १२ टक्क्याला ३२२० आणि १३ टक्क्याला ३४८६ असा कायद्यानुसार दर कारखानदारांना द्यावाच लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी १२.५० टक्के साखर उताºयामुळे ३४०० रु.चा पहिला हप्ता निश्चित मिळणार आहे. तरीही एफआरपी आणि अधिक ३०० रुपये असा दर कारखानदारांनी द्यावा, असे आवाहनही केले. तसेच साखरेचा भाव वाढला तर रंगराजन शिफारशीनुसार ७०:३० हा फॉर्म्युला वापरायचा असेही त्यांनी स्पष्ट केले. मी सत्तेत असलो तरी शेतकºयांचे प्रश्न सरकार ऐकत नसेल, तर आंदोलनासाठी बलिदानाची तयारी ठेवा, असे आवाहन खोत यांनी केले.
स्वागत मोहन माने यांनी तर प्रास्ताविक इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, सागर खोत, सतीश वुरुलकर, संघटनेचे युवाध्यक्ष शार्दुल जाधव आदींची भाषणे झाली. मेळाव्यास महाराष्ट्र, कोकण, खानदेश, कर्नाटक, आदी भागातून शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकºयांची दिवाळी गोड होणार
सरसकट कर्जमाफीचा ५० लाख शेतकºयांना लाभ मिळणार असून, त्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच २०१८ पर्यंत नियमित कर्जाची परतफेड करणाºयांनाही कर्जमाफी मिळणार आहे.
पवार शेट्टी एक गट्टी
बारामतीत जाऊन ज्या पवारांना नावे ठेऊन तुम्ही खासदार झालात, आता त्यांचे गुणगान तुम्ही गात गळ्यात गळे घालून फिरत आहात, असा आरोप खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केला.
प्रत्येक जिल्ह्यात वेगळीच गट्टी
आम्हाला एकनिष्ठ नाही म्हणणाºयांनी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर युती केली आहे. सत्तेसाठी सगळे चालतात मग सदाभाऊ का नाही चालला, असा सवालही खोत यांनी केला.
वजनकाट्यांची तपासणी करणार
राज्यातील अनेक साखर कारखाने काटा मारत असल्याच्या तक्रारी नियमित होत असतात. त्यामुळे यंदा मंत्री गिरीष महाजन यांना सांगून राज्यातील सर्व कारखान्यांच्या काट्यांवर छापे मारून अचानकपणे त्यांची तपासणी करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
मोबाईल अ‍ॅपचे लोकार्पण
संघटनेच्यावतीने शेतकºयांसाठी एक मोबाईल अ‍ॅप तयार केले असून, त्याला अँड्राईड मोबाईलवर सक्रिय केल्यास शेतकºयांना हवामानाचा अंदाज व बाजारभाव यासह आवश्यक माहिती, तसेच राज्य कृषिमंत्री यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांचे दूरध्वनी क्रमांक मिळणार आहेत. या अ‍ॅपचे लोकार्पणही या कार्यक्रमात मंत्री खोत यांच्या हस्ते केले.

Web Title: This is the first installment of Rs. 3400

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.