उदगाव ग्रामीण रुग्णालयासाठी ९० लाखांचा पहिला हप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:08+5:302021-07-14T04:30:08+5:30
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील मंजूर असलेल्या ग्रामीण रुग्णालयासाठी ९० लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. यातून रुग्णालयाच्या ...
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील मंजूर असलेल्या ग्रामीण रुग्णालयासाठी ९० लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. यातून रुग्णालयाच्या मुख्य इमारत बांधकामासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. रुग्णालय बांधकामासाठी एकूण १४ कोटी २१ लाख रुपये मिळणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
मंत्री यड्रावकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाला बळकट करण्यासाठी आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय मंजुरीसाठी प्रयत्न सुरु आहेत. उदगाव येथील ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून त्याच्या मुख्य इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे. या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यातील ९० लाख रुपये जमा झाले आहेत. शशिकला क्षय आरोग्यधामाच्या परिसरात हे रुग्णालय होणार असून त्यासाठी जागा निश्चिती झालेली आहे. त्यामुळे लवकरच ग्रामीण रुग्णालय पूर्ण होईल, असेही मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.