मनपाची पहिली ‘आयएसओ’प्राप्त शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:37 AM2019-04-26T00:37:13+5:302019-04-26T00:37:18+5:30

प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जाधववाडी येथील महानगरपालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, क्र. ३२ या शाळेने ‘सर्वांगीण ...

The first 'ISO' school received from the Municipal Corporation | मनपाची पहिली ‘आयएसओ’प्राप्त शाळा

मनपाची पहिली ‘आयएसओ’प्राप्त शाळा

Next

प्रदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जाधववाडी येथील महानगरपालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, क्र. ३२ या शाळेने ‘सर्वांगीण विकास’ हा निकष पूर्ण करीत ‘आयएसओ ९००१ : २०१५’ प्रमाणपत्र मिळविले आहे. आयएसओ मानांकन मिळविणारी महापालिकेची ही पहिली शाळा ठरली आहे.
जाधववाडी येथे शाळेची स्थापना १९५० साली सुरू झाली. जाधववाडी, कदमवाडी, संत गोरा कुंभार वसाहत, राजीव गांधी वसाहत, गांधीनगर, मुक्त सैनिक वसाहतसह रुईकर कॉलनी, रुकडी, रुईकर कॉलनी येथील विद्यार्थी या शाळेत शिकतात. या शाळेत बालवाडीसह मराठी व सेमी-इंग्रजी असे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरतात. शाळेत ४८७ विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुतेक मुलांचे पालक मध्यमवर्गीय आहेत. सामान्य मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अगोदर श्रमदान आणि मग उरलेल्या कामासाठी निधिसंकलन हे सूत्र ठरून शाळेने वाटचाल सुरू केली; त्यामुळे शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे.
शाळेची सुशोभित इमारत, पहिलीपासून सेमी-इंग्लिश, बोलक्या भिंती, ई-लर्निंग सुविधा, वर्गामध्ये ग्रीन बोर्ड, अशा वैशिष्ट्यांसह दर्जेदार शिक्षणामुळे पटसंख्येचा आलेख दरवर्षी वाढत आहे. विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी अ‍ॅक्वागार्डही शाळेत बसविले आहेत. विद्यार्थी वाचनालय यासारख्या वेगळ्या संकल्पना राबविल्या आहेत. शिष्यवृत्तीसह अन्य शाळाबाह्य परीक्षांतही विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. माजी महापौर वैशाली डकरे, विद्यमान नगरसेवक राजसिंह शेळके यांच्या प्रयत्नांमुळे शाळेचा कायापालट झाला आहे. परिसरातील अनेक दानशूरांच्या सहकार्यातून शाळेला सुविधा दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे शहरस्तर क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशिपचे उपविजेतेपद शाळेने पटकाविले आहे. शासनाकडून शाळेसाठी कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉलसाठी मैदान मंजूर झाले आहे. शाळेचा परिपाठ वैशिष्ट्यपूर्ण असून, रोज वेगळी प्रार्थना, समूहगीत म्हटले जाते. वाढदिवसाला ‘चॉकलेटऐवजी पुस्तक भेट द्या,’ या उपक्रमातून ३०० पेक्षा अधिक पुस्तके शाळेमध्ये जमा झाली आहेत. शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याने पालक वर्गही समाधानी आहे.

शंभर निकष पूर्ण करून मानांकन प्राप्त
शाळेने मे २०१६ मध्ये आयएसओ मानांकनासाठी संस्थेला माहिती सादर केली. जून महिन्यात अ‍ॅक्रिडिटेशन बोर्डाकडून पाहणी केली. शाळेकडून आएसओसाठी २३ जुलैला नोंदणी केली. संस्थेच्या त्रिसदस्यीय समितीकडून २५ आॅगस्टला शाळेची तपासणी करून त्रुटी दूर करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिला. त्रुटी दूर करून ५ सप्टेंबर २०१६ रोजी आयएसओ मानांकन जाहीर. १०० निकष पूर्ण करून हा मान मिळविला आहे. यामध्ये ७० टक्के भौतिक सुविधा, तर ३० टक्के गुणवत्तेवर गुण दिले.

Web Title: The first 'ISO' school received from the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.