देशात २४ वर्षांपूर्वी झाला मोबाईलचा पहिला कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 03:37 AM2019-08-02T03:37:43+5:302019-08-02T03:37:49+5:30
सुखराम - ज्योती बसू यांच्यात झाला होता संवाद
संदीप आडनाईक
कोल्हापूर : जगभरात मोबाईल वापरात भारताचा क्रमांक पहिल्या काही देशांत आहे; परंतु देशात २४ वर्षांपूर्वी मोबाईलचा पहिला वापर झाला होता आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुखराम यांनी ३१ जुलै १९९५ रोजी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पहिला मोबाईल कॉल केला होता.
भूपेंद्रकुमार क्रांतीचे सूत्रधार ज्योती बसू यांनी उद्योगपती भूपेंद्रकुमार मोदी यांच्याशी 1994 मध्ये भेटीत सर्वप्रथम कोलकात्यात मोबाईल नेटवर्क सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मोदी 90 च्या दशकात टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित होते. 09 महिन्यांनी भारतात मोबाईल सेवेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.
प्रवास असा...
रेगिनाल्ड फेसेन्डेनने अमेरिकेत मॅसेचुसेट्सपासून
11 मैल दूर अटलांटिक महासागरातील एका जहाजावर पहिला आवाजी रेडिओ संदेश
1906 मध्ये पाठविला.
04 एप्रिल १९७३ मध्ये मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपरने पहिला मोबाईल संवाद साधला आणि त्यालाच
1975 मध्ये या शोधाचे स्वामित्व हक्क दिले गेले.
1982 मध्ये युरोपातील दूरध्वनी कंपन्यांनी मोबाईल प्रणाली तयार केली.
1984 मध्ये मोटोरोलाने पहिला मोबाईल संच बाजारात आणला. त्यानंतर सुधारणा होत गेल्या.
आधुनिक काळात मोबाईल संभाषणाखेरीज इंटरनेट पाहणे, व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडिओ ऐकणे, जीपीएस वापरणे, पैसे देणे-काढणे इत्यादींकरिता वापरले जातात.
रुपये 16, मोजावे लागले मिनिटाला पहिल्या मोबाईल कॉलसाठी