दिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या पहिल्या टप्याला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:25+5:302021-07-07T04:28:25+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियाना’च्या पहिल्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. ...
कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियाना’च्या पहिल्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. दिवसभरात ५२ दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील कामकाज शहरात आणखी पाच दिवस चालणार आहे.
या अभियानाअंतर्गत महानगपालिका हद्दीतील सर्व दिव्यांगांची नोंदणी करणे, त्यांची तपासणी करताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे, विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि आरोग्यविषयक संदर्भसेवा उपलब्ध करून देऊन अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. उद्देश साध्य करण्यासाठी अभियानाची अमंलबजावणी चार टप्प्यांत केली जाणार आहे.
पहिल्या टप्यामध्ये सोमवारी प्रशासक तथा प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सदरबाजार प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या घरी जाऊन सर्वेक्षणाचे फॉर्म भरण्यात आले. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल पाटील, समन्वयक राजेंद्र आपुगडे, क्रांती संघटनेचे संजय आडके, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अतुल धनवडे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे देवदत्त माने, पॅराऑलिम्पिक स्पोर्टस असोसिएशनचे अरुण विभुते व विनायक सुतार उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींनी सर्वेक्षण करायला येणाऱ्या आशा वर्कर्सकडे आपली अचूक माहिती द्यावी. सोबत फोटो, आधार कार्ड, अपंग प्रमाणपत्र व बँक पासबुकची झेरॉक्स प्रतसुद्धा द्यावी, असे असे आवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले आहे.
फोटो क्रमांक - ०५०७२०२१-कोल- केएमसी
कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियाना’च्या पहिल्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रशासक कादंबरी बलकवडे, उपायुकत रविकांत आडसूळ यांनीही उपस्थिती लावली.