विद्यापीठाच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षा सुरळीत
By admin | Published: May 12, 2014 12:28 AM2014-05-12T00:28:36+5:302014-05-12T00:28:36+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षा रविवारी सुरळीत पार पडल्या. एम. ए., एम.ए.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षा रविवारी सुरळीत पार पडल्या. एम. ए., एम.ए. (मास. कम्यु.), बीजेसी, एमजेसी, एमबीए, एमबीए (एक्झिक्युटिव्ह) या अभ्यासक्रमांसाठी आॅफलाइन, तर एम.एस्सी. (प्राणिशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, ग्रोकेमिकल व पेस्ट मॅनेजमेंट, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) या अभ्यासक्रमांसाठी आॅनलाइन प्रवेश परीक्षा रविवारी घेण्यात आल्या. एकूण २ हजार ९९४ विद्यार्थी या दोन्ही परीक्षांसाठी बसले होते. कºहाड येथील केंद्रावरील तांत्रिक अडचण वगळता सर्वत्र परीक्षा सुरळीत पार पडल्या. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये या परीक्षा एकाच वेळी घेण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठातील मानव्यविद्या विभागाची इमारत व भूगोल अधिविभाग, विवेकानंद महाविद्यालय; सांगली जिल्ह्यात मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय व कस्तुरबाई वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय; तर सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट या परीक्षा केंद्रांवर आॅफलाइन परीक्षा घेण्यात आली. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, सांगली जिल्ह्यात राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, साखराळे आणि सातारा जिल्ह्यात दौलतराव आहेर कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, बानवडी, कºहाड या केंद्रांंवर आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली. (प्रतिनिधी)