पहिल्या टप्प्यात साडेनऊ लाख जणांना कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:24 AM2020-12-22T04:24:33+5:302020-12-22T04:24:33+5:30

कोल्हापूर : कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात साडेनऊ लाख जणांना लस देण्याची आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ...

In the first phase, nine and a half million people were vaccinated against corona | पहिल्या टप्प्यात साडेनऊ लाख जणांना कोरोना लस

पहिल्या टप्प्यात साडेनऊ लाख जणांना कोरोना लस

Next

कोल्हापूर : कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात साडेनऊ लाख जणांना लस देण्याची आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी लसीकरणाच्या प्रशिक्षणाबाबत सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हा कृती दल समितीची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, गोवा येथील सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. खैरनारे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, सी.पी.आर.च्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ उपस्थित होते.

काही दिवसांत कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लसीकरण कार्यक्रमापेक्षा पूर्णत: वेगळे आहे व पहिल्यांदाच ही लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यात कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोल्ड चेन व पुरवठा चेनबाबत योग्य नियोजन करावे.

डॉ. योगेश साळे म्हणाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व प्रकारचे खासगी नोंदणीकृत डॉक्टर, रुग्णालय, डिस्पेन्सरी, यांनी त्यांच्याकडे कार्यरत वैद्यकीय कर्मचारी यांची माहिती नजीकच्या शासकीय रुग्णालयात लसीकरणपूर्व नोंदणी करावी. कोविड लसीकरण ऐच्छिक असले तरी लसीकरणासाठी पूर्व नोंदणी अनिवार्य आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात लसीकरण होणारे अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदणी करून घ्यावी. गव्हर्नन्स अँड कोऑर्डिनेशन मेकॅनीझमद्वारे राज्यस्तरापासून ते तालुकास्तरापर्यत समन्वय साधण्यात येणार आहे.

जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण केले. यात लसीचे प्रकार, त्याची सद्य:स्थिती व कालावधी, लसीकरिता स्टोअरेजबाबत उपलब्धता, कोविंन सॉफ्टवेअरबद्दल अवगत केले. बैठकीला विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत रोटरी क्लब, लायन्स क्लब, रेडक्रॉस सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: In the first phase, nine and a half million people were vaccinated against corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.