ग्रामपंचायत लोकशाहीचे पहिले व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:17 AM2021-07-18T04:17:50+5:302021-07-18T04:17:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : ग्रामपंचायत हा पंचायत राज समितीतील पहिला स्तर असून, लोकशाही व्यवस्थेतील पहिले व्यासपीठ असल्याने ...

The first platform of Gram Panchayat democracy | ग्रामपंचायत लोकशाहीचे पहिले व्यासपीठ

ग्रामपंचायत लोकशाहीचे पहिले व्यासपीठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

करंजफेण : ग्रामपंचायत हा पंचायत राज समितीतील पहिला स्तर असून, लोकशाही व्यवस्थेतील पहिले व्यासपीठ असल्याने गावच्या विकासासाठी गावातील गटातटांचे राजकारण संपवून विकासाचे राजकारण करावे व ग्रामपंचायत सदस्यांनी विश्वस्त म्हणून काम करून गावाचा विकास साधावा, असे आवाहन पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार डाॅ. विनय कोरे यांनी घोटवडे (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायत इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलताना केले.

यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम सोहळा झाला. आम. डाॅ. विनय कोरे व आम. जयंत आसगांवकर यांच्या निधीतून घोटवडे गावात ग्रामपंचायतीची सुसज्ज अशी तीनमजली इमारत उभारली जाणार आहे. सरपंच रजनी पाटील यांच्या प्रयत्नांतून सुसज्ज अशा इमारतीचे नियोजन झाल्याने कोरे यांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, विशांत महापुरे, शिवाजी मोरे, पन्हाळा पंंचायत समिती सभापती वैशाली पाटील, उपसभापती रश्मी कांबळे, पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सरनोबत, शिक्षक नेते बाबासाहेब पाटील, दगडू पाटील, सरपंच रजणी पाटील, उपसरपंच माया पाटील बाजार समिती मा. संचालक बाबूराव खोत, उत्तम धुमाळ तसेच विजय बाऊचकर, धोंडीराम कुंभार, शहाजी कुदळे, संदीप यादव, ग्रामसेवक एकनाथ चौगुले, आदी उपस्थित होते.

फोटो : घोटवडे (ता. पन्हाळा) येथे नियोजित ग्रामपंचायत इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात आम. डाॅ. विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जयंत आसगावकर, पंचायत समिती सभापती वैशाली पाटील, उपसभापती रश्मी कांबळे, सरपंच रजनी पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: The first platform of Gram Panchayat democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.