कोल्हापुरात सीग्रेप विदेशी वृक्षाची प्रथमच शास्त्रीय नोंद; फळांपासून बनवितात जॅम, जेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:11 IST2025-01-27T13:11:34+5:302025-01-27T13:11:48+5:30

ताराबाई पार्कात आढळला वेगळा वृक्ष : डॉ. बाचूळकर यांनी पटवली ओळख

First scientific record of Seagrape exotic tree in Kolhapur; Jam, jelly is made from fruits | कोल्हापुरात सीग्रेप विदेशी वृक्षाची प्रथमच शास्त्रीय नोंद; फळांपासून बनवितात जॅम, जेली

कोल्हापुरात सीग्रेप विदेशी वृक्षाची प्रथमच शास्त्रीय नोंद; फळांपासून बनवितात जॅम, जेली

कोल्हापूर : कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरातील सर्किट हाऊसच्या पाठीमागील कल्पना पाटील यांच्या बंगल्यातील बागेत वृक्षप्रेमी परितोष उरकुडे आणि वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांना ‘सीग्रेप’ (सागरी द्राक्षे) हा आगळावेगळा विदेशी वृक्ष आढळला. जिल्ह्यात या वृक्षाची प्रथमच शास्त्रीय नोंद झाली आहे.

दहा-बारा वर्षांपूर्वी ‘फायकस लायरेटा’ या नावाने मलकापूर येथील नर्सरीतून आणलेल्या या वृक्षाची कल्पना पाटील यांनी लागवड केली होती. बाचूळकर यांनी या वृक्षाचे शास्त्रीय निरीक्षण केले असता त्याला फुले आणि फळे आल्याचे दिसून आले. यावरून हा वृक्ष फायकस लायरेटा नसल्याचे स्पष्ट झाले. पाटील यांच्या बागेत सीग्रेपचे तीन वृक्ष आहेत, यापैकी दोन नर, तर एक मादी वृक्ष आहे. आपल्या भागात या वृक्षांना फुलांचा बहर कमी येतो तसेच फलधारणा कमी प्रमाणात होते.

शास्त्रीय नाव : कोकोलोबा युव्हीफेरा
कूळ : पॉली गोनेएसी
आढळ : समुद्रकिनारी प्रदेश
द्राक्षांच्या घडाप्रमाणे फळांचे गुच्छ
८ ते १५ मीटर उंच वाढतो
फांद्या : अनेक, सर्व बाजूने पसरलेल्या
पाने : साधी एकाआड एक, गोलाकार, ८ ते १५ सेंमी लांब आणि २० ते २५ सेंमी रुंद
फुले : पांढरी, लहान आकाराची व सुगंधी
फुले फांद्यांच्या टोकांवर ६ ते १० सेंमी लांब मंजिरीत येतात
फळांचे झुपके द्राक्षांप्रमाणे खाली लोंबतात.
फळे गोलाकार, दोन सेमी व्यासांची, हिरवी, तांबूस व पिकल्यानंतर जांभळट रंगाची, रसाळ
फळांत एकच टणक, गोलाकार बी
फळांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅलशियम, झिंक, लोह
फळांपासून जॅम, जेली बनवितात

Web Title: First scientific record of Seagrape exotic tree in Kolhapur; Jam, jelly is made from fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.