पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन: बाळूमामांच्या नगरीत हरीनामाच्या जयघोषात पार पडला ग्रंथदिंडी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 09:06 PM2022-04-04T21:06:41+5:302022-04-04T21:07:45+5:30

क्षेत्र आदमापूर येथे हजारो वारकर्‍यांच्या सहभागाने गावातील प्रमुख मार्गावरून टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात ग्रंथदिंडी काढण्यात आली.

First Universal Sant Sahitya Sammelan Granth Dindi Ceremony Held in sant Balumama admapur kolhapur | पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन: बाळूमामांच्या नगरीत हरीनामाच्या जयघोषात पार पडला ग्रंथदिंडी सोहळा

पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन: बाळूमामांच्या नगरीत हरीनामाच्या जयघोषात पार पडला ग्रंथदिंडी सोहळा

googlenewsNext

सरवडे / वाघापूर : पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचा मान कोल्हापूरला मिळाल्याने जिल्ह्यातील तमाम वारकरी बांधवांनी सहभाग दर्शवत संमेलनाचा उत्साहात प्रारंभ केला. क्षेत्र आदमापूर येथे हजारो वारकर्‍यांच्या सहभागाने गावातील प्रमुख मार्गावरून टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडी सोहळ्यास जिल्ह्यातील वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पहिल्या विश्वात्मक साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी आदमापूर येथील मरगुबाई मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून भजन व हरीनामाच्या जयघोषात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ही दिंडी संत बाळुमामांच्या मंदिरात आल्यानंतर दिंडीची सांगता करण्यात आली. संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती मदन गोसावी व डॉ. रामचंद्र देखणे यांनी संत बाळूमामांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. अध्यक्ष गोसावी व डॉ. देखणे यांचा देवस्थान समितीच्यावतीने अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते व कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. 

दीपप्रज्वलन संमेलन अध्यक्ष न्यायमूर्ती गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथपूजन अध्यक्ष धैर्यशील भोसले व विणापूजन कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. विश्वशांतीसाठी संत साहित्य संमेलनांची गरज असल्याचं मत यावेळी बोलताना न्यायमूर्ती गोसावी यांनी व्यक्त केलं. स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा वारकरी मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वागवेकर यांनी केले. रात्री रामचंद्र देखणे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. संमेलनाच्या पहिल्या दिवशी आदमापूर येथे वारकरी संप्रदायाची उपस्थिती लक्षणीय होती.

Web Title: First Universal Sant Sahitya Sammelan Granth Dindi Ceremony Held in sant Balumama admapur kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.