प्रथम आम्ही लस घेणार.. न घाबरता तुम्हीही घ्या; डॉक्टरांचे आवाहन : सुरक्षिततेसाठी लसीकरण महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:20 AM2021-01-15T04:20:23+5:302021-01-15T04:20:23+5:30

कोल्हापूर : ‘लसीकरणात प्रथम आम्ही लस घेऊ न घाबरता; स्वत:च्या सुरक्षिततेसाठी तुम्हीही लस घ्या,’ असे आवाहन येथील खासगी वैद्यकीय ...

First we will get the vaccine .. don't be afraid, you too; Doctor's appeal: Vaccination is important for safety | प्रथम आम्ही लस घेणार.. न घाबरता तुम्हीही घ्या; डॉक्टरांचे आवाहन : सुरक्षिततेसाठी लसीकरण महत्त्वाचे

प्रथम आम्ही लस घेणार.. न घाबरता तुम्हीही घ्या; डॉक्टरांचे आवाहन : सुरक्षिततेसाठी लसीकरण महत्त्वाचे

Next

कोल्हापूर : ‘लसीकरणात प्रथम आम्ही लस घेऊ न घाबरता; स्वत:च्या सुरक्षिततेसाठी तुम्हीही लस घ्या,’ असे आवाहन येथील खासगी वैद्यकीय संघटनांचे अध्यक्ष, प्रतिनिधी, डॉक्टर्स यांनी गुुरुवारी येथे केले.

उद्या, शनिवारी जिल्ह्यात होणाऱ्या कोविड लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खासगी वैद्यकीय संघटनांचे अध्यक्ष, डॉक्टर्स, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, शनिवारी सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने लसीकरण यशस्वी करू. स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे.

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, ही लस अत्यंत सुरक्षित आहे. याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन, मास्क यांसारख्या सुरक्षिततेचा अवलंब करण्यात येणार आहे.

डॉ. हर्षवर्धन जगताप, अध्यक्ष होमिओपॅथी संघटना : कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन अतिशय सुरक्षित असून ती सर्वांनी घ्यावी. प्रतिकारशक्ती निर्माण होईल.

डॉ. पद्मराज पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर मानसोपचार तज्ज्ञ संघटना : आम्ही स्वत: प्रथम सहभागी होणार आहोत. आम्ही लस घेतल्यानंतर निश्चितपणे आपल्यातील आत्मविश्वास वाढेल. आपणही लस घ्यावी.

डॉ. शिरीष पाटील, अध्यक्ष, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन : लसीकरणामुळे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल. प्रत्येकाने निर्भीडपणे ही लस घ्यावी.

डॉ. आबासाहेब शिर्के, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, कोल्हापूर : गेले वर्षभर कोरोनाशी झगडत शासन, आरोग्य विभाग आणि प्रशासनाने साथ आटोक्यात आणली आहे. या लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत.

डॉ. राजेंद्र वायचळ, सचिव निमा असोसिएशन : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून लस घ्यावी.

डॉ. शीतल पाटील, सचिव, कार्यकारी सदस्य, केएमए : प्रथम फेरीत आम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्यसेवक ही लस घेत आहोत. सर्वांनी ही लस घेऊन कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावा.

डॉ. गीता पिल्लाई, सचिव, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन : कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी होणाऱ्या लसीकरणाचा सर्वांनी फायदा घ्यावा.

बाबा जांभळे, अध्यक्ष, रोटरी मूव्हमेंट, कोल्हापूर : ही लस सुरक्षित आहे. ती सर्वांनी घ्यावी.

जिल्हा व माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी लसीकरण मोहिमेच्या तयारीबाबत माहिती दिली. बैठकीला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, रोटरी क्लबचे सदस्य डॉ. आर. ए. पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, जमाते उलेमाचे अरिफसाहेब हवालदार, सिटी लायन्स आय हॉस्पिटलचे सचिव नरेंद्र पाध्ये, डॉ. अनिता सयबन्नावर, ‘निमा’चे अध्यक्ष डॉ. मुकुंद मोकाशी, आदी उपस्थित होते.

Web Title: First we will get the vaccine .. don't be afraid, you too; Doctor's appeal: Vaccination is important for safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.