पहिली कुस्ती बरोबरीत, शौकीन नाराज
By admin | Published: January 2, 2016 08:34 AM2016-01-02T08:34:08+5:302016-01-02T08:34:08+5:30
कोकरूड मैदान : दुसरी कुस्ती डफळेने जिंकली
कोकरुड : ‘हिंदकेसरी’ सुनील साळुंखे विरुद्ध ‘महाराष्ट्र केसरी’ समाधान घोडके यांची ३८ मिनिटे सुरू असणारी कुस्ती दीर्घकाळ रटाळ होत गेल्यामुळे पंचांनी प्रथम गुणांवर विजय न झाल्याने ती बरोबरीत सोडविली. तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कौतुक डफळे याने विजय गुटाळवर सहाव्या मिनिटानंतर झोळी डावावर प्रेक्षणीय विजय मिळविला. तसेच किरण भगत याने आप्पा घुटे याच्यावर चौथ्या मिनिटाला समोरून दुहेरी पट काढून विजय मिळविला.
कोकरुड येथे शुक्रवारी निनाईदेवी यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात सुमारे शंभरहून अधिक चटकदार कुस्त्या पार पडल्या. मैदानाचे पूजन फत्तेसिंग देशमुख, उदयसिंग देशमुख, बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.
तृतीय क्रमांकाच्या लढतीत शिवाजी पाटील व पोपट घोडके, तसेच राजाराम यमगर व संदीप काळे यांची कुस्ती बरोबरीत सुटली. चतुर्थ क्रमांकाच्या लढतीत विकास बंडगर याने रामदास पवारवर विजय प्राप्त केला.
यावेळी विजयी झालेले मल्ल असे - गणेश माने, रविराज यादव, कृष्णा घोडे, सौरभ नांगरे, शुभम चव्हाण, संजय चव्हाण (कोकरुड), संजय जाधव (कोल्हापूर), कुमार पाटील (शित्तूर), अजय निकम (रेड), अक्षय पाटील (कोतोली), संदीप बंडगर (इस्लामपूर), नितीन ढेरे (पणुंब्रे), सुनील पाटील (बिळाशी), प्रताप पाटील (कोतोली), तानाजी भोई (माळेवाडी), प्रमोद पाटील (चिंचोली).
या मैदानासाठी पंच म्हणून श्रीरंग नांगरे, दिनकर करूंगलेकर, संजय माने, भीमराव माने, संजय साळवी, निवास नांगरे, ज्ञानदेव घोडे, वसंत मोहिते, बाजीराव सनगर, रोहित घोडे, आनंदराव धुमाळ, संपतराव जाधव, बंडा पाटील यांनी काम पाहिले.
यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव घोडे-पाटील, माजी सभापती हणमंतराव पाटील, विकासराव नांगरे, पोपट पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.