कोरे अभियांत्रिकीत (स्वायत्त) प्रथम वर्ष प्रवेशाचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:10+5:302021-01-16T04:29:10+5:30

वारणानगर : ३७ वर्षांच्या देदीप्यमान कामगिरीची गुणवत्ता राखण्यात येथील तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम आणि द्वितीय वर्ष अभियांत्रिकी ...

First year admission in Core Engineering (Autonomous) | कोरे अभियांत्रिकीत (स्वायत्त) प्रथम वर्ष प्रवेशाचा ओघ

कोरे अभियांत्रिकीत (स्वायत्त) प्रथम वर्ष प्रवेशाचा ओघ

Next

वारणानगर : ३७ वर्षांच्या देदीप्यमान कामगिरीची गुणवत्ता राखण्यात येथील तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम आणि द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशात विद्यार्थ्यांची पसंती मिळवून पालक व विद्यार्थ्यांनी विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविली आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी केले.

येथील तात्यासाहेब कोरे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालय परिसरात गर्दी केली. कॉम्प्युटर इंजिनीअरिंग या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या ऋतुजा सदानंद गुरव (गुण ९१.३३) या विद्यार्थिनीचे व त्यांच्या पालकांचे अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी ॲडमिशन इन्चार्ज डॉ. ए. व्ही. पाटील, विविध विभागाचे प्रमुख, रजिस्ट्रार डी. एस. ठोंबरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी व कमी पर्सेंटाइल असलेल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन परिपूर्ण व गुणवंत अभियंता तयार करण्यासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध असेल, असे सांगितले. वारणा शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांचे मार्गदर्शन मिळाले.

.................... ....................

फोटो ओळी : तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम प्रवेश निश्चित करणाऱ्या ऋतुजा गुरव हिचे स्वागत प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी केले. सोबत ॲडमिशन इन्चार्ज डॉ. ए. व्ही. पाटील, विभाग प्रमुख, रजिस्ट्रार.

Web Title: First year admission in Core Engineering (Autonomous)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.