राज्यसेवा पूर्व परीक्षेस साडेपाच हजार विद्यार्थ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:28 AM2021-09-05T04:28:17+5:302021-09-05T04:28:17+5:30

कोल्हापूर: कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलावी लागलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा अखेर शनिवारी झाली. सकाळी ११ ते १२ या ...

Five and a half thousand students in the pre-service examination | राज्यसेवा पूर्व परीक्षेस साडेपाच हजार विद्यार्थ्यांची दांडी

राज्यसेवा पूर्व परीक्षेस साडेपाच हजार विद्यार्थ्यांची दांडी

Next

कोल्हापूर: कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलावी लागलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा अखेर शनिवारी झाली. सकाळी ११ ते १२ या वेळेत एक तासाची ही परीक्षा कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ५८ केंद्रावर १४ हजार १०५ जणांनी दिली. ५ हजार ६५९ परीक्षार्थी गैरहजर राहिले. कोरोनाचे सर्व नियम पाळत ही परीक्षा दिली. परीक्षेच्या निमित्ताने तब्बल दीड वर्षानंतर शहरातील शाळा, महाविद्यालयातील केंद्रावर झालेल्या गर्दीमुळे परीक्षेचा माहोल दिसला. विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त परीक्षा दिली. दरम्यान पेपर काहीसा अवघड असलातरी बरा गेल्याच्या प्रतिक्रिया परीक्षार्थीनी दिल्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी १९ हजार ७६४ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. तशी कोल्हापूर शहर व परिसरातील ५८ उपकेंद्रांवर बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. महसूल विभागाच्या वतीने याचे सर्व नियोजन केले होते. कोरोना प्रतिबंधासाठी मास्क, सॅनिटायझर यांचा वापर बंधनकारक करण्यात आला होता. परीक्षेला येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, प्रवेश प्रमाणपत्राची झेराॅक्स अशी कागदपत्रे सोबत आहेत का ते पाहूनच परीक्षार्थींना आत सोडण्यात येत होते. ११ ही पेपर सुरू होण्याची वेळ असली तरी तीन तास आधीच केंद्रावर येण्याचे फर्मान आधीच काढले असल्यामुळे परीक्षा केंद्रावर सकाळी ८ पासूनच गर्दी दिसत होती.

फोटो ओळ: ०४०९२०२१-कोल-एमपीएससी ०१, ०२

फोटो ओळ: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवारी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी कोल्हापुरातील स.म.लाेहिया शाळेच्या केंद्रावर अशा प्रकारे तपासणी व कोरोनाच्या निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करतच परीक्षार्थीना केंद्रात सोडले जात होते. (छाया: आदित्य वेल्हाळ)

Web Title: Five and a half thousand students in the pre-service examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.