निपाणीच्या तवंदी घाटात पुन्हा अपघात, पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 06:46 PM2019-06-04T18:46:32+5:302019-06-04T18:50:23+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील तवंदी घाटात पायथ्याशी असलेल्या अमर हॉटेलजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत तर दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताने महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून ती सुरळीत होण्यास रात्र उलटेल, असा अंदाज आहे.
निपाणी/कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तवंदी घाटात पायथ्याशी असलेल्या अमर हॉटेलजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत तर दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानेमहामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून ती सुरळीत होण्यास रात्र उलटेल, असा अंदाज आहे.
या अपघाताने जानेवारीत झालेल्या भीषण अपघाताची आठवण ताजी झाली. या अपघातात सहाजण ठार झाले होते.दरम्यान, निपाणी घाटात आज दिवसभरात तीन वेगवेगळ्या अपघातात एकुण दहाजण जखमी झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील तवंदी घाटात पायथ्याशी असलेल्या अमर हॉटेलजवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात राजस्थानहून भरधाव वेगाने बंगलोरहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रकने (आरजे ४८ इए ५१२६) सांगलीकडे जाणाºया लाकूड वाहतूक करणाºया ट्रकला (एमएच१0 सीए ५२७७) जोरदार धडक दिली.
राजस्थानच्या ट्रकने सांगलीकडे जाणाऱ्या ट्रकला इतक्या जोरात धडक दिली की लाकूड वाहतूक करणारा हा ट्रक सर्व्हिस रोडवर विरुध्द दिशेला तोंड करुन उलटला. यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद झाली. दरम्यान, ज्या राजस्थानच्या ट्रकने धडक दिली, तो ट्रकही महामार्गावर विरुध्द दिशेला रस्त्याच्या मधोमध आडवा पडला. यामुळे या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.
या अपघातात राजस्थानच्या ट्रकमधील रणजित दास (वय ३५, रा. केरळ) सोनासिंग (वय २८, रा. राजस्थान), मोहंता चंगमई (वय ३८, रा. आसाम) हे पाजजण किरकोळ जखमी झाले आहेत तर सांगलीच्या ट्रकमधील गणपत वैष्णव (वय १८, रा. भिलवडी) आणि संजय वाळुंजेकर (वय ३0, रा. नगर) हे किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांना निपाणीच्या महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आणखी दोन वेगवेगळ्या अपघातात सहाजण जखमी
दरम्यान, निपाणीजवळील हालसिध्दनाथ कारखान्याजवळ अपघातात दोन महिलांसह चारजण जखमी झाले आहेत. हा अपघातही पाच वाजण्याच्या सुमारासच झाला. या अपघातातील जखमींना महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर आणखी एका अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे, त्याच्यावरही याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जानेवारीतील भीषण अपघाताची आठवण
या अपघाताने परिसरातील नागरिकांचा थरकाप झाला. जानेवारीत झालेल्या भीषण अपघाताची आठवण यामुळे ताजी झाली. ५ जानेवारी २0१९ रोजी याच जागेवर फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकने बेळगावकडे निघालेल्या कारला समोरुन धडक दिल्याने मुरगुड येथील जमादार कुटूंबियांतील सहाजण ठार झाले होते.