कोडोलीत पाच दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 02:06 PM2020-08-07T14:06:52+5:302020-08-07T14:10:28+5:30

कोडोली : कोरोना विषाणूचा ससंर्ग वाढत असलेने कोडोली ता.पन्हाळा येथे शुक्रवारपासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय कोरोना विषाणू मुक्ती समितीने घेतला.

Five-day public curfew in Kodoli | कोडोलीत पाच दिवस जनता कर्फ्यू

कोडोलीत पाच दिवस जनता कर्फ्यू

Next
ठळक मुद्देकोडोलीत पाच दिवस जनता कर्फ्यू ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे - सरपंच शंकर पाटील

कोडोली : कोरोना विषाणूचा ससंर्ग वाढत असलेने कोडोली ता.पन्हाळा येथे शुक्रवारपासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय कोरोना विषाणू मुक्ती समितीने घेतला.

येथील सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या कर्फ्यूला नागरीक व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच शंकर पाटील यानी केले.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखणेसाठी तहसिलदार यांच्या मार्गदर्शनानुसार व्यापारी व ग्रामस्थ यांची मते अजमावून जनता कर्फ्यूचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये. मेडिकल व दुध संकलन संस्था हॉस्पिटल २४ तास नियमाप्रमाणे चालू राहतील व अन्य विमा संस्था,बँका, पतसंस्था,दुध शॉपी,मटण मार्केट , भाजीपाला विक्री,हॉटेल,शेतीविषयक पूर्णतः बंद रहाणार आहेत.

या नियमांचे भंग केलेचे निदर्शनास आलेस सदर विक्रेत्याचे दुकान १५ दिवसाकरीता सिल करुन त्याचेवर गुन्हा दाखल केला जाईल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी कोरोनाचे अहवाल उशिरा येत असलेने सरपंच यांचे सह सर्वानी नाराजी व्यक्त केली. सध्या येथील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या पन्नास पर्यन्त चालली आहे. तर चाळीसवर अहवाल प्रलंबीत आहेत.

ग्रामसमितीने घेतलेला निर्णय बंधनकारक असून नियम मोडणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे फौजदार नरेद्र पाटील यानी सांगितले.

यावेळी कोडोली व्यापारी असो. अध्यक्ष बाबा पाटील, उपाध्यक्ष सूरज शहा, माजी सरपंच नितीन कापरे , विलास पाटील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम, तलाठी अनिल पोवार, कृषी सहाय्यक सुरज भंडारी, संजय बजागे,संतोष जाधव, सुरेश पाटील, प्रविण जाधव , आरोग्य सेवक सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Web Title: Five-day public curfew in Kodoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.