कोल्हापूर रंगणार पाच दिवस कलामहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:34 AM2018-12-18T00:34:03+5:302018-12-18T00:38:53+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरच्या कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या वतीने २२ ते २६ तारखेदरम्यान कोल्हापूर कला महोत्सवाचे आयोजन ...
कोल्हापूर : कोल्हापूरच्या कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या वतीने २२ ते २६ तारखेदरम्यान कोल्हापूर कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
दसरा चौकातील मैदानात पाच दिवस रंगणाºया या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि. २२) सकाळी १० वाजता कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील चित्रकार, शिल्पकार, हस्तकारागीर सहभागी होणार आहेत. शिवाय विविध स्पर्धा, कलाप्रात्यक्षिकांचेही सादरीकरण होणार आहे. रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून, पाच दिवस या रंगारंग महोत्सवाचा लाभ रसिकांना मिळणार आहे.
महोत्सवात चित्र-शिल्पकारांचे स्वतंत्र दालन असून, त्याबरोबरच कागदकाम, लाकडी खेळणी, देवदेवता-महापुरुषांच्या मूर्ती, मातीची खेळणी, पॉटरी यांचे कमर्शिअल स्टॉल असतील. शिवाय निसर्ग छायाचित्रकारांचे, तसेच कोल्हापुरातील लोकजीवन, विविध वास्तू यांचे कृष्णधवल छायाचित्रांचे प्रदर्शन असणार आहे. कोल्हापूरची खासीयत असलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बचतगटांच्या माध्यमातून उभारण्यात येत आहेत, तरी रसिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस समन्वयक प्रशांत जाधव, कार्यवाह अजेय दळवी, चित्रकार विजय टिपुगडे यांच्यासह कलाकार उपस्थित होते.
शनिवार (दि. २२)
सकाळी १० : उद्घाटन
सायंकाळी ६ वाजता : गणेश वंदना, राजर्षी शाहू महाराज गौरवगीत व महात्मा गांधी वंदन. सादरकर्ते : शाहीर राजू राऊत.
रविवार (दि. २३)
सकाळी १० वाजता : बालचित्रकला स्पर्धा, बालक -पालक मेळावा. भव्य कॅनव्हासवर महात्मा गांधी जीवन दर्शन सामूहिक चित्र अविष्कार
सायंकाळी सहा वाजता : सेव्हन मेलिडीज इन्स्ट्रूमेंटल (सेक्सोफोन) सादरकर्ते : प्रकाश साळोखे
सोमवार (दि. २४)
सकाळी १० ते १२ : चित्र-शिल्पकारांची प्रात्यक्षिके. नादब्रह्म हा शास्त्रीय सुगमसंगीत कार्यक्रम. सादरकर्ते अमोल राबाडे, नागेश पाटील
सायंकाळी ६ वाजता : रसिकरंजन वाद्यवृंद प्रस्तूत मानाचा मुजरा कार्यक्रम सादरकर्ते : महेश सोनुले.
मंगळवार (दि. २५)
सकाळी १० ते १२ : निमंत्रित चित्र-शिल्पकारांची प्रात्यक्षिके. डॉ. आनंद धर्माधिकारी यांचा शास्त्रीय-सुगम संगीत कार्यक्रम
सायंकाळी सहा वाजता : जीवनगाणे कार्यक्रम. बासरी वादन सादरकर्ते प्रा. सचिन जगताप, केदार गुळवणी, प्रशांत देसाई.
बुधवार (दि. २६)
सकाळी १० ते १२ : शास्त्रीय-सुगम संगीत. सादरकर्ते : रोहित फाटक.
चित्र-शिल्पकारांच्या प्रात्यक्षिकांचा मुक्ताविष्कार
सायंकाळी सात वाजता : महोत्सवाचा सांगता समारंभ, विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण व ज्येष्ठ कलावंतांचा गौरव