समिती प्रशासनासह पोलिसांची करडी नजर : पाच दिवसांनंतर बाजार समितीतील भाजीपाला सौदे पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:13 PM2020-04-18T17:13:52+5:302020-04-18T17:15:54+5:30

गर्दी टाळण्याचे आदेश पोलिसांचे होते आणि व्यापारी सौदे काढण्यास तयार नव्हते, अशा कचाट्यात समिती प्रशासन अडकले होते. सौदे काढणार नसतील तर व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता.

Five days later the vegetable deals in the market committee undo | समिती प्रशासनासह पोलिसांची करडी नजर : पाच दिवसांनंतर बाजार समितीतील भाजीपाला सौदे पूर्ववत

समिती प्रशासनासह पोलिसांची करडी नजर : पाच दिवसांनंतर बाजार समितीतील भाजीपाला सौदे पूर्ववत

googlenewsNext
ठळक मुद्दे कोणीही गर्दी करू नये, शिस्तीचे पालन करण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने आवाहन करीत होती.

कोल्हापूर : तब्बल पाच दिवसानंतर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याचे सौदे पूर्ववत झाले. पोलीस प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन व सामाजिक अंतराचे पालन करीत खरेदी-विक्री झाली.
भाजीपाला व फळ मार्केटमध्ये सौद्याच्या वेळी सामाजिक अंतर राखले जात नसल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मंगळवार (दि. १४) पासून भाजीपाल्याचे सौदे बंद केले होते. जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा थांबवायचा नाही, असा फतवा राज्य सरकारचा होता, गर्दी टाळण्याचे आदेश पोलिसांचे होते आणि व्यापारी सौदे काढण्यास तयार नव्हते, अशा कचाट्यात समिती प्रशासन अडकले होते. सौदे काढणार नसतील तर व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता. त्यानंतर शनिवारपासून सौदे काढण्याची तयारी दर्शवली.

त्यानुसार सकाळी साडेपाचपासून पोलीस, समितीच्या कर्मचाºयांच्या उपस्थितीत सौदे काढण्यात आले. समितीच्या मुख्य गेटवरच खरेदीदारांना पास दिले होते. वाहनचालक व खरेदीदार दोघांना स्वतंत्र पास होते. वाहन आत आले की पार्किंग होईल. खरेदीदार भाजी मार्केटमध्ये जाईल, जाताना दोन ठिकाणी पास पाहून आत सोडले होते. बॅरेकेडच्या आत व्यापारी, दिवाणजी आणि तोलाईदार तर बाहेर खरेदीदार उभे राहिल्याने नेहमीपेक्षा गर्दी कमी झाली होती. सौद्याच्या वेळी पोलिसांची करडी नजर व्यापाºयांवर होती. कोणीही गर्दी करू नये, शिस्तीचे पालन करण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने आवाहन करीत होती.

दुपारी दीडपर्यंत मालाचा उठाव
साधारणत: भाजीपाला व फळे मार्केटमध्ये सकाळी अकरापर्यंत मालाचा उठाव होतो. मात्र, शनिवारी गर्दी टाळण्यासाठी विविध ठिकाणी अडथळे उभे केले होते, त्यातून माल घेऊन बाहेर पडण्यास उशीर लागत होता. त्यामुळे दुपारी दीडपर्यंत भाजीपाला व फळांचा उठाव सुरू राहिला.

समितीच्या पत्राशिवाय प्रवेश नाही
खरेदीदारांना समितीच्या वतीने पत्रे दिली आहेत, ती पाहूनच त्यांना प्रवेश व खरेदीचा पास दिला जातो. शनिवारी शंभरहून अधिकजणांकडे पत्रे नसल्याने प्रवेश दिला नाही. त्यांना सौदे संपल्यानंतर समितीकडे मागणी केली.

पहाटे साडेतीन वाजताच कर्मचारी हजर
समितीच्या सर्व कर्मचा-यांना शनिवारी सकाळीच बोलवले होते. बाजार समितीचे सचिव मोहन सालपे, उपसचिव जयवंत पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी पहाटे साडेतीन वाजता समितीत हजर होते. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, वसंत बाबर यांच्यासह पोलीस उपस्थित राहिले.
---------------------------------------------
शनिवारची आवक -
फळे - १,०५२ क्विंटल
भाजीपाला - १,९०७ क्विंटल

 

Web Title: Five days later the vegetable deals in the market committee undo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.