पाच दिवसांत ‘पीएफ’=कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडून हालचाली -सौरभ सुमन प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:04 AM2018-03-23T01:04:52+5:302018-03-23T01:04:52+5:30

डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) कार्यालयाचे कामकाज १५ आॅगस्टपर्यंत पेपरमुक्त करून ते आॅनलाईन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

Five days 'PF' = Movement by Kolhapur divisional office - Saurabh Suman Prasad | पाच दिवसांत ‘पीएफ’=कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडून हालचाली -सौरभ सुमन प्रसाद

पाच दिवसांत ‘पीएफ’=कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडून हालचाली -सौरभ सुमन प्रसाद

googlenewsNext
ठळक मुद्देसौरभ प्रसाद : आॅनलाईन प्रक्रियेसाठी ५० ‘एमआयडीसीं’मध्ये कार्यशाळा

- प्रविण देसाई -

डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) कार्यालयाचे कामकाज १५ आॅगस्टपर्यंत पेपरमुक्त करून ते आॅनलाईन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्या दृष्टीने कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडून हालचाली सुरू असून, पुढील महिन्यापासून विभागातील ५० एम.आय.डी.सीं.मध्ये आस्थापना व कर्मचाऱ्यांसाठी जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे भविष्य निधी आयुक्त सौरभ सुमन प्रसाद यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘पीएफ’ कार्यालयाच्या कामकाजासह विविध उपक्रमांचे स्वरूप या संदर्भात त्यांच्याशी साधलेला थेट संवाद...

प्रश्न : कोल्हापूर विभागात किती आस्थापना व कर्मचारी आहेत? महिन्याला किती ‘पीएफ’ जमा होतो?
उत्तर : भविष्य निधीच्या कोल्हापूर कार्यालयांतर्गत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे येतात. या विभागात सुमारे ९००० आस्थापना असून, त्यामध्ये जवळपास ११ लाख भविष्य निधीधारक कर्मचारी संलग्न आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ४०००, सातारा जिल्ह्यात १५००, सांगली जिल्ह्यात १५००, रत्नागिरीमध्ये १५००, सिंधुदुर्गमध्ये ५०० आस्थापनांचा समावेश आहे. कोल्हापूर विभागात सुमारे तीन लाख कर्मचाºयांचा ४५ कोटी रुपये ‘पीएफ’ कोल्हापूर कार्यालयाकडे दर महिन्याला जमा होतो.
प्रश्न : ‘पीएफ’संदर्भात कर्मचाºयांनी काय दक्षता घ्यावी?
उत्तर : ‘पीएफ’ काढण्यासाठी कार्यालयाने आता ‘आॅनलाईन’ सुविधा केली आहे. ‘पीएफ’चा दावा (क्लेम) करून संगणकीय पोर्टल किंवा ‘उमंग’ अ‍ॅपद्वारे कर्मचारी आपले पैसे काढू शकतात. या आॅनलाईन प्रक्रियेमुळे कर्मचाºयांना भविष्य निधी कार्यालयाकडे वारंवार फेºया माराव्या लागणार नाहीत. तसेच त्यासाठी प्रत्यक्ष सहीची किंवा कागदपत्रांची गरज लागणार नाही; परंतु त्यांना काही शर्तींची पूर्तता करावी लागेल. त्यामध्ये पहिल्यांदा कर्मचाºयांनी सक्रिय (अ‍ॅक्टिव्हेट) करावा लागणार आहे. ‘युनिव्हर्सल’ क्रमांकधारक कर्मचाºयांना आपले आधार क्रमांक व बॅँक खाते क्रमांक हे ‘युनिव्हर्सल’ क्रमांकासोबत लिंक करावे लागणार आहेत. त्याचबरोबर मोबाईल क्रमांकातील सीम कार्डला आधार क्रमांक लिंक करावा. तसेच ताराबाई पार्क येथील भविष्य निधीच्या कार्यालयातही सुविधा उपलब्ध केली असून, येथेही कर्मचारी येऊन प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
प्रश्न : कर्मचाºयांचा ‘पीएफ’ भविष्य निधी कार्यालयाकडे जमा न करणाºया आस्थापनांवर काय कारवाई केली जाते?
उत्तर : कर्मचाºयांच्या पगारातून ‘पीएफ’ची रक्कम कापून घेऊन ती भविष्य निधी कार्यालयाकडे जमा न करणे हा गुन्हा आहे. असे प्रकार करणाºया आस्थापनांवर भारतीय दंडसंहितेनुसार कलम ४०५ व ४०६ अन्यवे ‘क्रिमिनल ब्रिच आॅफ ट्रस्ट’ अ‍ॅक्टअन्वये कारवाई केली आहे. कोल्हापूर विभागातील ३६ नगरपालिका व नगरपरिषदांना ‘सेक्शन ७ ए आॅफ द अ‍ॅक्ट मे असेसमेंट’द्वारे कंत्राटी कामगारांचे ‘पीएफ’चे पैसे भविष्य निधी कार्यालयाकडे जमा न केल्याबद्दल कायदेशीर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. याचा चांगला परिणाम झाला असून इतर आस्थापनांकडून वेळेवर ‘पीएफ’चे पैसे आपल्या कार्यालयाकडे जमा केले जात आहे. तरीही कुठला आस्थापना असा प्रकार करीत असल्यास तेथील कर्मचाºयांनी आपल्याशी संपर्क साधावा.
प्रश्न : कर्मचारी निवृत्त झाल्यावर किती दिवसांत त्याच्या खात्यावर ‘पीएफ’ जमा केला जातो?
उत्तर : कर्मचाºयांनी निवृत्त झाल्यावर आॅनलाईन पद्धतीने दावा (क्लेम) दाखल केल्यावर पाच दिवसांत संबंधिताला पी.एफ.ची रक्कम मिळू शकते. तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना मिळणारी पेन्शनही १० दिवसांत मिळते. भविष्य निधी कार्यालयातील कर्मचाºयांना त्यांच्या निवृत्तीदिवशी पेन्शनची कागदपत्रे समारंभपूर्वक दिली जातात. ही कागदपत्रे बॅँकेत जमा केल्यावर संबंधितांना तत्काळ पेन्शन सुरू होते.
प्रश्न : ‘पीएफ’च्या आॅनलाईन प्रक्रियेबाबत कशा पद्धतीने जनजागृती सुरू आहे?
उत्तर : ‘पीएफ’च्या आॅनलाईन प्रक्रियेबाबत पुढील महिन्यापासून भविष्य निधी कार्यालयातर्फे कोल्हापूर विभागातील ५० ‘एमआयडीसीं’मध्ये जनजागृतीपर कार्यशाळा घेऊन मालक व कर्मचाºयांचे प्रबोधन केले जाणार आहे. तसेच आधार कार्ड व युनिव्हर्सल क्रमांकाची माहिती एकमेकांना सुसंगत होत नसेल तर याच्या दुरुस्तीसाठी भविष्य निधी कार्यालयात ‘युआयडीआय’ व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आधार सेंटर सुरू करण्यात येणार आहे. आस्थापनांच्या मालकांसाठी ‘डिजिटल सिग्नेचर’ किंवा ई-साईन (ई-साक्षांकन) ही सुविधा आपल्या कार्यालयाकडून मोफत देण्यात आली आहे. यासाठी सुमारे ९००० आस्थापनांच्या मालकांना मोबाईलद्वारे संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यांनी कर्मचाºयांकडून ही माहिती भरून घेऊन ती द्यायची आहे; परंतु आतापर्यंत फक्त १००० आस्थापनांनीच ही कार्यवाहीकेली आहे. तरी संबंधितांनीभविष्य निधी कार्यालयाच्या ६६६.ीस्रा्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर ‘ई-साईन’ करून घ्यावे.
 

Web Title: Five days 'PF' = Movement by Kolhapur divisional office - Saurabh Suman Prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.