शहरात पाच उड्डाणपूल, पाच भुयारी मार्ग वाहतूक समस्येवरील ‘मास्टर प्लॅन’ : पालकमंत्र्यांसमोर लवकरच प्रस्तावाचे सादरीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:55 AM2018-01-11T00:55:09+5:302018-01-11T00:56:24+5:30

कोल्हापूर : अरूंद रस्ते, छोटे-छोटे चौक, पार्किंगचा उडालेला बोजवारा, अपूर्ण रिंगरोड, रस्त्यावर रेंगाळणारी वाहतूक यामुळे शहरातील वाहतुकीच्या गंभीर प्रश्नावर उत्तर शोधण्याचे

Five flyovers in the city, 'master plan' on five suburban traffic issues: The proposal will be submitted to the Guardian Minister soon | शहरात पाच उड्डाणपूल, पाच भुयारी मार्ग वाहतूक समस्येवरील ‘मास्टर प्लॅन’ : पालकमंत्र्यांसमोर लवकरच प्रस्तावाचे सादरीकरण करणार

शहरात पाच उड्डाणपूल, पाच भुयारी मार्ग वाहतूक समस्येवरील ‘मास्टर प्लॅन’ : पालकमंत्र्यांसमोर लवकरच प्रस्तावाचे सादरीकरण करणार

Next

भारत चव्हाण ।
कोल्हापूर : अरूंद रस्ते, छोटे-छोटे चौक, पार्किंगचा उडालेला बोजवारा, अपूर्ण रिंगरोड, रस्त्यावर रेंगाळणारी वाहतूक यामुळे शहरातील वाहतुकीच्या गंभीर प्रश्नावर उत्तर शोधण्याचे प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिका आणि राज्य शासन यांनी सुरू केले आहेत. त्यातच भाग म्हणून शहरातील वर्दळीच्या विविध भागात पाच उड्डाणपूल तर पाच ठिकाणी भुयारी मार्गांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. लवकरच त्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर सादरीकरण केले जाईल, त्यांच्या काही सूचना असल्यास त्यानुसार बदल करून याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरीला पाठविला जाणार आहे.

पाच महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयात शहरातील वाहतुकीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी यावर पर्याय शोधून त्यावर काम सुरू करा, म्हणून सांगितले होते. बैठकीस वाई येथील गुरव असोसिएटचे संदीप गुरव आणि महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबतसुद्धा उपस्थित होते. गुरव आणि सरनोबत यांनी हे काम आव्हान म्हणून स्वीकारले आणि अवघ्या पाच महिन्यांच्या अभ्यासानंतर शहरात पाच ठिकाणी उड्डाणपूल तर पाच ठिकाणी भुयारी मार्गांचे आराखडे तयार केले. सध्या आराखडे तयार झाले असले तरी अजून त्याच्या खर्चाची अंदाजपत्रके तयार केलेली नसून त्याचे काम सुरू झाले आहे.

वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत
शहरातील अरूंद रस्ते, वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न आणि त्यातून पुढे सरकणारी वाहतूक हा शहराला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा एक गंभीर प्रश्न आहे. त्यावर आजपर्यंत केवळ पोलीस खात्यानेच मार्ग काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यास महानगरपालिका प्रशासन अथवा राज्य शासन यांची म्हणावी तितकी साथ मिळाली नाही.
परंतु आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच पुढाकार घेतला असून, त्यांनी नवीन वर्षात शहरातील उड्डाणपूल व भुयारी मार्गांना मंजुरी मिळवून निधी उपलब्ध करून दिल्यास पुढील पन्नास वर्षांचा वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. स्वत: पालकमंत्रीच या प्रकल्पाकरिता आग्रही असल्याने काही तरी चांगले घडेल, अशी अपेक्षा आहे.


शहरातील नियोजित उड्डाणपूल
रस्त्याचे नाव लांबी रुंदी प्रकार
दाभोळकर चौक ते जनता बझार चौक ९५० मीटर ८ मीटर दुहेरी मार्ग
दाभोळकर चौक ते दसरा चौक २००० मीटर ८ मीटर दुहेरी मार्ग
जोतिबा हॉटेल चौक ते कावळा नाका चौक २००० मीटर ८ मीटर दुहेरी मार्ग
टाऊन हॉल ते जयंती नाला ७०० मीटर ८ मीटर दुहेरी मार्ग
पापाची तिकटी ते रंकाळा टॉवर चौक २००० मीटर ८ मीटर एकेरी मार्ग


रस्त्याचे नाव लांबी रुंदी प्रकार
सासने मैदान ते दाभोळकर कॉर्नर १५० मीटर ८ मीटर दुहेरी मार्ग
खासबाग मैदान चौक १५० मीटर ८ मीटर दुहेरी मार्ग
पद्माराजे गर्ल्स हायस्कू ल चौक १५० मीटर ८ मीटर दुहेरी मार्ग
बी. टी. कॉलेज चौक शाहूपुरी १५० मीटर ४ मीटर एकेरी मार्ग


विरोधाची भूमिका नकोच
कोल्हापूर शहरात काही नवीन करायचे म्हटले की त्यास विरोध झालाच म्हणून समजा; तसा पूर्वानुभव अनेक कामात आलेला आहे. त्यामुळे या कामात तरी सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे. प्रकल्प काय आहे, रस्ते कसे होणार आहेत याची माहिती घेऊन अभ्यास करूनच मग त्यावर आपले काही म्हणणे असल्यास सादर करणे अपेक्षित आहे. अगदी सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका घेणे सोयीचे होणार नाही, आणि येणारा काळसुद्धा माफ करणार नाही. त्यामुळे चर्चा, संवाद आणि सामंजस्याची भूमिकाच हिताची ठरणार आहे.

दाभोळकर कॉर्नर ते जनता बझार चौक या मार्गावर उड्डाणपूल झाल्याने मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वाहतुकीचा भार बºयाच प्रमाणात हलका होणार आहे, तसेच स्टेशन रोडवरील वाहतूक कमी होईल, शिवाय पादचाºयांची रेल्वे लाईन ओलांडताना होणारी जीवघेणी कसरतही कायमची बंद होणार आहे.

शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याने आणि रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे शक्य नाही. त्यामुळे एकाच वेळी सगळी कामे करता येणे अशक्य आहे; म्हणून निधी मिळेल तशी कामे करता यावीत म्हणून प्रत्येक कामाचे आराखडे, खर्चाची अंदाजपत्रके स्वतंत्रपणे केली जात आहेत.
भास्करराव जाधव पुतळा (पाच बंगला) १५० मीटर ४ मीटर एकेरी मार्ग

Web Title: Five flyovers in the city, 'master plan' on five suburban traffic issues: The proposal will be submitted to the Guardian Minister soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.