कोल्हापूरच्या पाच जणांचा राष्ट्रीय सुवर्णलक्ष्य पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:29 AM2021-09-16T04:29:49+5:302021-09-16T04:29:49+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरातील स्टायकर्स तायक्वोंदो ॲकडमीचे प्रशिक्षक अजित येसणे, रसिका माधव निगवेकर, अथर्व मदनपुरे, आशितोष शिर्के व ...
कोल्हापूर : कोल्हापुरातील स्टायकर्स तायक्वोंदो ॲकडमीचे प्रशिक्षक अजित येसणे, रसिका माधव निगवेकर, अथर्व मदनपुरे, आशितोष शिर्के व राधिका संदीप पाटील या पाच जणांचा राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय सुवर्णलक्ष्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात येथे मेजर ध्यानचंद क्रीडा परिषद (नवी दिल्ली) यांच्या वतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राष्ट्रीय तायक्वोंदो स्पर्धेतील सरस कामगिरी लक्षात घेऊन कोल्हापूरच्या या पाच जणांचा राष्ट्रीय सुवर्णलक्ष्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या वेळी सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राहुल पवार, शेखर माने आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : १५०९२०२१-कोल-स्टायकर्स
आेळी : कोल्हापुरातील स्टायकर्स तायक्वोंदो ॲकडमीच्या अजित येसणे यांच्यासह पाच जणांचा राष्ट्रीय सुवर्णलक्ष्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.