जुनैनाच्या थॅलेसेमिया शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:12 AM2020-11-19T11:12:26+5:302020-11-19T11:18:28+5:30

Medical, help, bloodbank, kolhapur, hospital थॅलेसेमियावर उपचार घेत असलेल्या अ‌वघ्या तीन वर्षांच्या जुनैना नदाफ या चिमुकलीवरील बोन मॅरो ट्रान्स्प्लांट या शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांची गरज आहे. सध्या तिच्यावर बंगलोरमधील रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची पाच वर्षांची मोठी बहीण रिजवाना ही दाता आहे. ही शस्त्रक्रिया उद्या, शुक्रवारी होणार आहे. तिचा एकूण खर्च १८ लाखांवर असून पाच लाख रुपये कमी पडत आहेत. तरी दानशूरांनी माझ्या लेकीसाठी मदत करावी, असे कळकळीचे आवाहन तिचे वडील जावेद नदाफ यांनी केले आहे.

Five lakhs needed for Junaina's thalassemia surgery | जुनैनाच्या थॅलेसेमिया शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांची गरज

जुनैनाच्या थॅलेसेमिया शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांची गरज

Next
ठळक मुद्देजुनैनाच्या थॅलेसेमिया शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांची गरज बंगलोरमध्ये उपचार सुरू : उद्या शस्त्रक्रिया

कोल्हापूर : थॅलेसेमियावर उपचार घेत असलेल्या अ‌वघ्या तीन वर्षांच्या जुनैना नदाफ या चिमुकलीवरील बोन मॅरो ट्रान्स्प्लांट या शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांची गरज आहे. सध्या तिच्यावर बंगलोरमधील रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची पाच वर्षांची मोठी बहीण रिजवाना ही दाता आहे. ही शस्त्रक्रिया उद्या, शुक्रवारी होणार आहे. तिचा एकूण खर्च १८ लाखांवर असून पाच लाख रुपये कमी पडत आहेत. तरी दानशूरांनी माझ्या लेकीसाठी मदत करावी, असे कळकळीचे आवाहन तिचे वडील जावेद नदाफ यांनी केले आहे.

पोस्टल कॉलनी, पाचगाव येथील जावेद नदाफ हे रिक्षा व्यावसायिक असून त्यांना पाच वर्षांची रिजवाना आणि तीन वर्षांची जुनैना या दोन मुली आहेत. जुनैनाला जन्मत:च थॅलेसेमिया हा आजार आहे. तिच्यावर बोन मॅरो ट्रान्स्प्लांट ही शस्त्रक्रिया करावी लागणार असून, मोठी बहीण रिजवाना हीच दाता झाली आहे. जुनैनावर बोन मॅरो ट्रान्स्प्लांटआधीची एक शस्त्रक्रिया सात तारखेला झाली असून तिची प्रकृती चांगली आहे. रिजवानाला आज, गुरुवारी दवाखान्यात दाखल करण्यात येणार आहे. तिला पाच-सहा दिवसांत डिस्चार्ज मिळेल; पण जुनैनाला पुढील दोन-तीन महिने तिथेच राहावे लागणार आहे. या सगळ्याचा खर्च मोठा आहे.

--
आभार आणि आवाहनही

जुनैनाच्या मदतीसाठी ह्यलोकमतह्णमध्ये मदतीचे आवाहन करणारी बातमी मार्चमध्ये प्रसिद्ध झाली होती. यातून बऱ्यापैकी मदत झाली. जावेद यांनी घरावर कर्ज काढून आणि लोकांच्या मदतीतून १३ लाख रुपये उभे केले आहेत. पुढील उपचारासाठी आणखी पाच लाख रुपये कमी पडत आहे. यापूर्वी आपण सर्वांनी केलेल्या मदतीसाठी मी आभार मानतो. आता मुख्य शस्त्रक्रियेसाठी एवढी मदत करा, अशी साद त्यांनी घातली आहे.


येथे करा मदत

  • आयडीबीआय खाते : ६१५१००१०००५३०१
  • आयएफसी कोड : आयबीकेएल००००६१५
  • गुगल पे किंवा पेटीएमनेसुद्धा ७३८५५४८९६४, ८४२१९२१९६४ या नंबरवर पैसे पाठवू शकता.


 

Web Title: Five lakhs needed for Junaina's thalassemia surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.