आणखी पाच मुले कुपोषित!

By Admin | Published: November 7, 2016 01:05 AM2016-11-07T01:05:06+5:302016-11-07T01:05:06+5:30

दोन गंभीर : सीपीआरमध्ये उपचार; शित्तूर-मलकापूरच्या निवासी शाळेतील विद्यार्थी

Five more children are malnourished! | आणखी पाच मुले कुपोषित!

आणखी पाच मुले कुपोषित!

googlenewsNext

कोल्हापूर : शित्तूर तर्फ मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील प्रेरणा मागासवर्गीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे आधार विद्यालय या निवासी शाळेतील आणखी पाच गतिमंद मुलांना रविवारी रात्री उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पूजा नायडू (वय १६), गोट्या (१५), पीके (८), रेश्मा (७), संजना (१२) अशी त्यांची नावे आहेत.
योग्य आणि सकस आहार न मिळाल्याने या मुलांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी मृत झालेल्या गांधी या मुलाच्या मृत्यूचे कारण मात्र अस्पष्ट असले तरी ही मुले कुपोषित असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शित्तूर (ता. शाहूवाडी) येथील गतिमंद निवासी शाळेतील गांधी (वय १५), खुशी (७) व कार्तिक (१०) या तीन मुलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. यातच उपचार सुरू असतानाच शनिवारी गांधी याचा मृत्यू झाला. उर्वरित खुशी व कार्तिक यांची प्रकृती चिंताजनक असली, तरी सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यांना रविवारी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या विद्यालयातील आणखी पाच मुलांना जुलाब, उलट्याचा त्रास आणि अशक्तपणा जाणवू लागला. त्यावर त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले. आधीच्या दोन आणि आणखी पाच अशा एकूण सात मुलांवर बालरोगतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. या मुलांवरील उपचारादरम्यान त्यांचे सुरू असलेले ओरडणे बघून अनेक रुग्ण, नातेवाइकांचे जीव हळहळत होते. योग्य, पुरेसे आणि सकस अन्न मिळत नसल्याने मुलांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. अशा स्वरुपातील कुपोषित मुलांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शनिवारी दाखल केलेल्या तिन्ही मुलांच्या अंगात रक्त कमी असल्याने अशक्तपणा आला आहे; पण कुपोषणामुळे गांधी याचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (पान १ वरून) खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी रविवारी ‘सीपीआर’ला भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. कुपोषणाच्या या प्रकाराची रविवारी शासकीय यंत्रणेने यात विशेषत: जिल्हा परिषदेकडून तातडीने आढावा घेण्यात आला. (प्रतिनिधी)
ही जबाबदारी कोणाची?
संस्था विनाअनुदानित असताना अनाथ मुले तिथे ठेवली कोणी? त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू असले तरी त्यांची पुढील जबाबदारी नेमकी कोणाची, हे मुद्दे नव्याने पुढे येणार आहेत.

संस्थेवर कारवाई निश्चित!
प्रेरणा मागासवर्गीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे २०१४ मध्येच मान्यता रद्द केलेली आहे. मान्यता नसताना संस्थेने मुलांची जबाबदारी कशी घेतली, हा प्रश्न असून याबाबतचा अहवाल पुणे आयुक्तांकडे यापूर्वीच पाठविला आहे. त्यामुळे संस्थेवर निश्चित कारवाई होणार असल्याचे समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी बोलताना सांगितले.

‘सीपीआर’मध्ये दाखल झालेली तिन्ही मुले कुपोषित आहेत. त्यांतील गांधी याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्याशिवाय मृत्यूबाबत काही निष्कर्ष काढता येणार नाही.
उच्चस्तरीय चौकशी
या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार
यांनी सांगितले.
- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता

Web Title: Five more children are malnourished!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.