हवालाची रोकड लुटीप्रकरणी पाचजणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 05:52 PM2019-06-17T17:52:58+5:302019-06-17T17:56:35+5:30
कोल्हापूर येथील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीचे दोन किलो सोने, ६७ लाखांची रोकड व एक महागडी कार असा एक कोटी १८ लाख रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटणाऱ्या पाचजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३२ लाखांची रोकड, ३० लाखांची सोन्याची बिस्कीटे, कार व दुचाकी असा सुमारे ६७ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या रॅकेटमध्ये आणखी साथीदारांचा समावेश असून, पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : येथील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीचे दोन किलो सोने, ६७ लाखांची रोकड व एक महागडी कार असा एक कोटी १८ लाख रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटणाऱ्या पाचजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३२ लाखांची रोकड, ३० लाखांची सोन्याची बिस्कीटे, कार व दुचाकी असा सुमारे ६७ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या रॅकेटमध्ये आणखी साथीदारांचा समावेश असून, पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
संशयित आरोपी मुख्य सूत्रधार लक्ष्मण अंकुश पवार (वय २६, रा. खटके वस्ती, लिंगीवरे, ता. आटपाडी, जि. सांगली), गुंडाप्पा तानाजी नंदीवाले (२६, रा. तमदलगे, ता. हातकणंगले), अविनाश बजरंग मोटे (२६, रा. शिवाजी चौक, हातकणंगले), अक्षय लक्ष्मण मोहिते (२६, र. आंबेडकर नगर, हातकणंगले), इंद्रजित बापु देसाई (२४, रा. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अहवालातील रोकड व दागिने मुंबईहून कोल्हापुरात येणार आहेत, याची टिप कोणी दिली. रेकी कोणी केली. यासंदर्भात माहिती घेण्याचे काम सुरू असून, लवकरच आणखी काही महत्त्वाचे पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे.
राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेंद्रनगर येथील एका हॉटेलपाठीमागे ‘लक्ष्मी गोल्ड बुलियन’ कार्यालयाजवळ कारच्या (के. ए. ४८ एन. ००६७) समोर दरोडेखोरांनी दुसरी कार आडवी लावून चिंतामणी पवार, सुशांत कदम, सागर सुतार यांचे अपहरण करून त्यांच्या कारमधील हवालाची रोकड, दागिने असा सुमारे एक कोटी १८ लाख १२ हजार किमतीचा मुद्देमाल लुटला होता.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, दोन कार एकामागून जाताना दिसून आल्या. शिवाजी पुलावरील सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्या रत्नागिरीच्या दिशेने जाताना दिसून आल्या. पोलिसांनी तपास केला असता, संशयित लक्ष्मण पवार याने त्याचा मेव्हणा गुंडाप्पा नंदिवाले, अविनाश मोटे, अक्षय मोहिते, इंद्रजित देसाई यांच्यासह अन्य साथीदारांना हाताशी धरून लुटमार केली आहे; त्यासाठी स्वत:ची कार वापरली असल्याचे निष्पन्न झाले.
सोमवारी संशयित पवार मेव्हणा नंदीवाले याच्याकडे येणार असल्याची माहिती मिळाली. त्याच्या घराच्या आसपास पोलिसांनी सापळा लावला. कार (एम. एच. १२ एफ. वाय. ४५६९) नंदीवाले याच्या घरासमोर उभी होती. त्यामध्ये तिघेजण बसले होते. त्यांच्यासह कारची झडती घेतली असता, पवार याच्याकडे सात लाख, नंदीवालेकडे नऊ लाख रोकड व १५ लाखांची अर्धा किलोची सोन्याची बिस्कीटे, मोटे याच्याकडे आठ लाख व अर्धा किलो सोने अशी सुमारे ३२ लाखांची रोकड, ३० लाखांचे एक किलो सोने सापडले.
चौकशीमध्ये त्यांची गुन्ह्यांची कबुली देत वृत्तपत्रात आलेल्या बातमीची चर्चा करण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. आणखी दोन साथीदार येणार असल्याचे सांगितले. काही वेळातच मोहिते व देसाई मोटारसायकलवरून आले. त्यांचा पोलिसांनी ताबा घेतला. दोघांच्या खिशामध्ये प्रत्येकी चार असे आठ लाख रुपये मिळून आले.