जिल्ह्यातील पाच पोलीस झाले फौजदार, साडेसात वर्षांनंतर संपली प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:58 AM2020-10-21T11:58:08+5:302020-10-21T12:00:28+5:30
पोलीस खात्यांतर्गत फौजदार परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही तब्बल साडेसात वर्षांनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पाच police, kolhapurnews पोलिसांना फौजदारपदी पदोन्नती मिळाली. राज्यातील सुमारे १०६८ जणांना ही पदोन्नती देण्यात आली. पोलीस महासंचालकांनी मंगळवारी सायंकाळी हे पदोन्नतीचे आदेश काढले. तसेच पदोन्नतीपाठापाठ त्यांच्या बदलीचेही आदेश निघाले.
कोल्हापूर : पोलीस खात्यांतर्गत फौजदार परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही तब्बल साडेसात वर्षांनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पाच पोलिसांना फौजदारपदी पदोन्नती मिळाली. राज्यातील सुमारे १०६८ जणांना ही पदोन्नती देण्यात आली. पोलीस महासंचालकांनी मंगळवारी सायंकाळी हे पदोन्नतीचे आदेश काढले. तसेच पदोन्नतीपाठापाठ त्यांच्या बदलीचेही आदेश निघाले.
कोल्हापुरात फौजदारपदी पदोन्नती झालेल्यांमध्ये (कंसात बदलीचे ठिकाण) स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील सहायक फौजदार इकबाल गुलाब महात (नागपूर), पासपोर्ट विभागातील विलास भोसले (कोल्हापूर परिक्षेत्र), शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील रमेश ठाणेकर (कोकण परिक्षेत्र), अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील यशवंत उपराटे (कोकण परिक्षेत्र), करवीर पोलीस ठाण्यातील चंद्रकांत उर्फ राजू श्रीेपती भोसले (अमरावती) यांचा समावेश आहे.
राज्यातील आठ हजार पोलीस पोलीस पदोन्नतीच्या प्रतीक्षेत या मथळ्याखाली लोकमतने या विषयावर प्रकाश टाकला होता. २०१३ मध्ये खात्यांतर्गत फौजदार पदोन्नतीसाठी पोलिसांच्या परीक्षा घेण्यात आल्या. त्यामध्ये १९००० जण उत्तीर्ण झाले होते. पण त्यांपैकी आतापर्यंत फक्त २४७९ जणांना फौजदारपदी पदोन्नती देण्यात आली होती; तर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत ८५२१ पोलीस निवृत्त झाले.
उर्वरित सुमारे आठ हजार पोलिसांपैकी १०६१ जणांना फौजदार पदोन्नतीचे आदेश मंगळवारी सायंकाळी पोलीस महासंचालकांनी काढले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त पाच पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित जणांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षाच आली.